Sprain स्प्रेन् v.t.--- लचकणे. n.--- उसण, लचक.
Sprawl स्प्रॉल् v.i.--- हातपाय ताणून निजणे. अस्ताव्यस्त पसरणे.
Spray स्प्रे n.--- झाडाची नेहमी फुलणारी डहाळी. पाने / फुले यांची आकर्षक मांडणी. हवेतून उडणारे / उडविले जाणारे पाणी इ. चे बारीक शिंतोडे. फवारा, शिडकावा.
Spread स्प्रेड् v.t.--- पसरणे, फैलावणे. n.--- फैलाव, पसारा, प्रसार. a.--- पसरलेला, फैलावलेला.
Sprig स्प्रिग् n.--- डहाळी, अंकुर.
Sprightly स्प्राइट्ली a.--- उत्साही, उल्हसित.
Sprout स्प्राउट् v.i.--- (अंकुर, पालवी इ. चे) बाहेर पडणे, फुटणे, वाढणे. v.t.--- (वनस्पति इ. चे) अंकुर, पालवी इ. बाहेर टाकणे / काढणे. n.--- अंकुर, फूट, कोंभ, मोड.
Spruce स्प्रूस् a.--- लकलकीत, चक्क, लक्क, नीटनेटका. v.t.--- नीटनेटका करणे.
Spud स्पड् v.t./ v.i.--- खणून काढणे, खणणे, खोदणे, (भूमीत) छिद्र पाडणे, नलिकाकूप खोदणे.
Spume स्प्यूम् n.--- फेस, मळी, समुद्राचा फेस.
Spunk स्पंक् n.--- कापूस, कांकडा, दम. धैर्य, तेज, हिम्मत.
Spunky स्पंकी a.--- धैर्यशील; धीट.
Spur स्पर् v.t.--- कांटा मारणे, टोचणे. टाच मारणे, प्रेरिणे. n.--- नखी, नांगी, आर, खुंट. पर्वतशाखा, डोंगराची उपशाखा. घोड्यास मारण्याची (हाकण्याची) टाच. प्रेरणा.
Spurious स्प्यूरिअस् a.--- नकली, खोटा, बनावट.
Spurn स्पर्न् v.t.--- लाथाडणे, धिक्कारणे, झिंझाडणे, तिरस्कार करणे. n.--- धिक्कार, छी थू, तिटकारा.
Spurt स्पSर्ट् n.--- एखाद्या कर्मातील एकदम वाढविलेला जोर / गति / आवेश. v.--- असा जोर इ. लावणे / आणणे. n.--- जोराची / तीव्र उसळी / उकळी / फवारा. v.--- अशा उसळी इ. ने बाहेर येणे / आणणे.
Sputnik स्पु(स्प)ट्निक् n.--- (रशियन भाषेंत) पृथ्वीचा कृत्रिम उपग्रह.
Sputter स्पटर् v.i.--- तिडतिडणे, बोलताना थुंकी उडविणे. n.--- तुषार, पुट्पुट.
Sputum स्प्यूटम् n.--- थुंकी, थुंकी / कफ इ. चा बडका.
Spy स्पाय् v.t.--- हेरून काढणे, पाहणे. n.--- हेर, बातमीदार.
Spyglass स्पाय्-ग्लास् n.--- दुर्बीण.
Squab स्कॉब् a.--- लठ्ठ, गिड्डा, वाटोळ्या अंगाचा.
Squabble स्कॉबल् v.t.--- कलागत करणे, मंडणे. n.--- कलागत.
Squad स्क्वाड् n.--- मंडळी, कवायतीकरता जमलेले शिपाई.
Squalid स्क्वॉलिड् a.--- घाण, गलिच्छ, किळसवाणा, उद्वेगजनक.
Squall स्क्वाल् v.t.--- टाहो / किंकाळी फोडणे. n.--- टाहो, वावटळ, वादळ.
Squally स्क्वालि a.--- वावटळीचा.
Squalor स्क्वॉलर् n.--- गलिच्छपणा व किळसवाणेपणा.
Squander स्क्वान्डर् v.t.--- उधळणे, व्यर्थ दवडणे, फुंकणे.
Square स्क्वेअर् v.t.--- चौपट करणे, वर्ग करणे, नीट करणे. n.--- चौरस, द्विघात, गुण्या, कोट, वर्ग. चतुष्पथ, चौक, चौरस्ता, चवाठा, चव्हाटा. सर्व बाजू समान व सर्व कोण काटकोण असलेला चौकोन. a.--- चौकोनी, चौरस. जाडजूड, बळकट. न्याय्य, सचोटीचा, सरळपणाचा, कांटेकोर, सुस्पष्ट, तंतोतंत (बरोबर), सरळ, थेट. पूर्ण, भरपूर, भरपेट, पोटभर (भोजनादि). Square with --- -शी मेळ खाणे / जुळणे.
Square root स्क्वेअर् रूट् n.--- वर्गमूळ.
Squash स्क्वॉश् v.t.--- चेंदामेंदा करणे, चेंचणे, दाबणे, दाबून पिळणे, रगडणे, दडपणे, दडपून टाकणे. n.--- चेंचणे, वाटणे, इ. ची प्रक्रिया, चेंदामेंदा, चेंडू-दांडूचा एक खेळ, काकडीच्या जातीचे फळ / भाजी.
Squat स्क्वॉट् v.i.--- उकिडवे बसणे / बसविणे; दबून बसणे / बसविणे. खाली बसणे. a.--- (जमीन वगैरे वर) बेकायदा कबजा करून बसलेला; बसका; बुटका व जाड.
Squatty स्क्वॉटी a.--- बुटका, बसका व जाड.
Squawk स्क्वॉक् v.--- एकदम जोराने किंचाळणे (उदा. पोपटाचे). (च्या विरुद्ध) आवाज उठविणे, जोरकसपणे विरोध व्यक्त करणे. n.--- एकदम मारलेली किंचाळी (उदा. पोपटाची), जोरदार प्रकट विरोध.
Squeak स्क्वीक् v.i.--- किंचाळणे. n.--- किंचाळी. सुटका.
Squeaker स्क्वीकर् n.--- किंचाळणारा, खिंकाळणारा, टुरटुर करणारा.
Squeaky स्क्वीकी a.--- ‘Squeak’ -विषयक / -स्वरूपाचा.
Squeaky-clean स्क्वीकी-क्लीन् a.--- अगदी स्वच्छ, लख्ख.
Squeal स्क्वील् v.i.--- किंचाळणे. n.--- किंचाळी.
Squeamish स्क्वीमिश्
Squeeze स्क्वीझ् v.t.--- चेंगरणे, कुस्करणे, दाबणे.
Squelch स्क्वेल्च् v.i.--- पडणे, आदळणे, धडपडणे, तुडविणे, दडपणे, चेपणे, चिरडणे, चिरडून टाकणे.
Squint स्क्विंट् v.t.--- काणे बघणे. a.--- तिरळा, तिरवा. n.--- तिरळेपणा.
Squirm स्क्वर्म् v.i.--- वळवळणे, (व्यथेने) तळमळणे, अस्वस्थ होणे. वळवळत जाणे.
Squirrel स्क्विरल् n.--- खार. v.t.--- चोरून साठवणे.
Squirt स्क्वर्ट् n.--- चिळकांडी. v.i.--- चिळकांडीने बाहेर येणे; चिळकांडीने सोडणे.