Aun-Avo

Aunt आन्ट् n.--- मावशी, आत्या, चुलती, मामी.
Aura आॅरा n.--- प्रभावी वातावरण. दीप्ति, उन्मेष; तेजोवलय.
Aural आॅरल् a.--- ऐकण्यासंबंधीचा; श्रावणविषयक, श्रवणेन्द्रियाचा.
Aurate आॅरेट् a.--- सोन्याचा मुलामा दिलेला.
Auricle आॅरिकल् n.--- बाहेरील कान, रक्ताशयाचा अवयव.
Auricular आॅरिक्युलर् a.--- कानासंबंधी, कानाचा.
Aurora आॅरोरा n.--- पहाट, उषा, प्रभावलय.
Auscultation आॅस्कल्टेशन् n.--- श्रवण-इंद्रियांतून निघणारे आवाज ऐकून रोगचिकित्सा करण्याची प्रक्रिया.
Auspice आॅस्पिस् n.--- शुभचिन्ह, शकुन.
Auspices आॅस्पिसेस् n.--- कृपादृष्टि, आश्रय, प्रसाद, देखरेख, नेतृत्व, पुढाकार, तत्वावधान.
Auspicious आॅस्पिशस् a.--- शुभ, मंगल.
Aussie आॅझी n.--- ऑस्ट्रेलियावासी.
Austere आॅस्टिअर् a.--- कठोर, निष्ठुर, आंबटकडू.
Austerity आॅस्टेरिटी n.--- आंबटपणा, निष्ठुरपणा, कठोर/कडक शिस्त, आत्मसंयम, साधी राहणी, काटकसरीची राहणी.
Autarchy आॅटर्की n.--- पूर्ण सार्वभौमत्व; एकाकेंद्रित सत्तापद्धति; स्वयंपूर्णता.
Authentic आॅथेन्टिक् a.--- सप्रमाण, खरा, विश्वसनीय, सत्य.
Authenticate आॅथेन्टिकेट् v.t.--- सप्रमाण खरा करणे.
Authenticity आॅथेन्टिसिटि n.--- सत्यता, खरेपणा.
Author आॅथर् n.--- ग्रंथकर्ता, ग्रंथकार, करता, उत्पादक, रचयिता, उगम.
Authoress आॅथरेस् n.--- ग्रंथकर्ती.
Authoritative आॅथाॅरिटेटिव्ह् a.--- सप्रमाण, अधिकारयुक्त, दराऱ्याचा.
Authority आॅथाॅरिटी n.--- अधिकार, सत्ता, प्रमाण, आधार, सनद, वाचन, अधिकारी, सरकार, भारवस्ती.
Authorize आॅथाॅराइझ् v.t.--- अधिकार देणे, परवानगी देणे.
Authorless आॅथरलेस् a.---
Autism आॅटिझम् n.--- सभोवतालच्या व्यक्तींशी संबंध विकसित करण्याची असमर्थता, भकासपणे, तंद्रीत, तीच-तीच प्रक्रिया वारंवार करणे, भाषणविकास खुंटणे, इ. लक्षणांनी युक्त बालमानसविकृति (डाॅ कॅनर कल्पित), आत्ममग्नता.
Autismistic आॅटिझ्मिस्टिक् a.--- Autism विषयक, आत्ममग्न(-ताग्रस्त)
Autistic आॅटिस्टिक् a.--- = Autismistic
Autobiography आॅटोबायोग्राफी n.--- आत्मचरित्र.
Autocracy आॅटाॅक्रसी n.--- मुखत्यारी, स्वधिपत्य.
Autocrat आॅटोक्रॅट् n.--- सर्वसत्ताधीश, सम्राट, मुखत्यार, राजा.
Autocratic(al) आॅटोक्रॅटिक् / आॅटोक्रॅटिकल् a.--- अनिर्बंध सत्ता चालविणारा. केवळ स्वतःच्या मर्जीप्रमाणे अधिकार गाजविणारा.
Autograph आॅटोग्राफ् n.--- स्वदस्तुराचा लेख, स्वतःच्या हाताने केलेली स्वतःची(स्वाक्षरी) सही.
Autographic(al) आॅटोग्रॅफिक् / आॅटोग्रॅफिकल् a.--- लेखकाच्या/रचयित्याच्या स्वहस्ताक्षरांतील, स्वाक्षरीच्या स्वरूपाचा.
Autography आॅटोग्रफी n.--- स्वहस्ते केलेले लेखन, स्वहस्तलेखन, जसे लिखित/चित्रित असेल तसेंच प्रतिकृति-रूपाने उमटविण्याची प्रक्रिया, हस्ताक्षरांचा/ स्वाक्षऱ्यांचा संग्रह.
Automate आॅटमेट् v.t.--- स्वयंचलित, यंत्रबद्ध करणे.
Automatic(al) आॅटोमॅटिक्(-कल्) a.--- स्वयंचलित, स्वयंगति, आपोआप चालणारा.
Automation
Automaton आॅटोमेटन् n.--- आपोआप चालणारे यंत्र.
Automobile आॅटाॅमोबील् a./n.--- स्वयंगति (वाहन) यंत्रवाहन, मोटरगाडी.
Autonomic(al) आॅटाॅनाॅमिक् / आॅटाॅनाॅमिकल् a.--- स्वतः स्वतंत्रपणे चालविलेला/चाललेला, आपोआप चाललेला, स्वाधीन.
Autunomize आॅटाॅनोमाइझ् v.t.--- -ला स्वाधीन/स्वायत्त करणे.
Autonomous आॅटाॅनाॅमस् a.--- स्वाधीन, स्वायत्त, स्वतंत्र.
Autonomy आॅटाॅनमी n.--- स्वाधीनता, स्वायत्तता, स्वातंत्र्य.
Autotomy आॅटाॅटमी n.--- स्वावच्छेदन, पालीसारख्या प्राण्यांमध्ये आढळणारी स्वतःच्या अवयवास शरीरापासून वेगळे करण्याची प्रक्रिया.
Autopsy आॅटाॅप्सी n.--- प्रत्यक्ष पाहणी, समक्ष तपासणी; शवपरीक्षा. (इ. स. १९३८ मध्ये हॅन्स अॅस्पर्शर यांनी प्रथम योजिलेला शब्द).
Autumn आॅटम् n.--- शरद ऋतु, हिवाळा.
Auxiliary आॅक्झिलिअरि a.--- सहाय्यकारी, कर्ता.
Avail अॅव्हेल् v.t.--- फायदा करून घेणे. v.i.--- उपयोगी पडणे, उपयोगी असणे, सहाय्य करणे. n.--- फायदा, उपयोग. Avail oneself of / Avail of =-चा फायदा/उपयोग करून घेणे.
Available अॅव्हेलेबल् a.--- उपयोगी पडण्याजोगा, फायदेशीर, चालू.
Avalanche अॅव्हलांश् n.--- डोंगरावरून घसरणारा बर्फाचा खडक, डोंगरावरून फुटून / सुटून वेगाने खाली कोसळत राहणारा बर्फ व खडक यांचा मोठा समूह. अचानक व जोरदारपणे वेधून/घेरून टाकणारी गर्दी/जमाव. v.t.--- अचानकपणे व जोराने वेढून हैराण करणे. v.i.--- ‘Avalanche’ च्या रूपांत सारखे घसरत कोसळणे.
Avant-guard अॅव्हॅन्ट्-गार्ड् n.---
Averis अॅव्हरिस् n.--- द्रव्यलोभ, लालूच, हाव.
Avaricious अॅव्हरिशस् a.--- द्रव्यालोभी, कृपण, कद्रु.
Avast अॅवास्ट् int.--- पुरे, पुरे करा, हांहां.
Avant अॅव्हाॅन्ट् int.--- चल जा, दूर हो.
Avenge अॅव्हेन्ज् v. t.--- सूड उगविणे -घेणे. Avenge(onesel)f = सूड घेऊन/वचपा काढून समाधान करणे. (The Buddhists plotted to avenge themselves.)
Avenger अॅव्हेन्जर् n.--- सूड उगविणारा-घेणारा.
Avenue अॅव्हेन्यू n.--- द्वार, दुतर्फा झाडांचा रस्ता.
Aver अॅव्हर् v.t.--- प्रतिज्ञेने सांगणे.
Average अॅव्हरेज् n.--- सरासरी, मध्यम प्रमाण. a.--- मध्यम. v.t.--- मध्य काढणे. v.i.--- सरासरीने भरणे.
Averment अॅव्हरमेण्ट् n.--- प्रतिपादन, प्रतिज्ञा, दावा, शपथपूर्वक कथन.
Averse अॅव्हर्स् a.--- प्रतिकूळ, त्रास करणारा, विमुख.
Aversion अॅव्हर्शन् n.--- त्रास, कंटाळा, चिळस.
Avert अॅव्हर्ट् v.t.--- टाळणे, चुकविणे, मागे घेणे.
Aviary एव्हिअरि n.--- पक्ष्यांचा शिकारखाना.
Avid अॅव्हिड् a.--- लोभी, हावरा.
Avidity अॅव्हिडिटि n.--- हावरेपणा, हव्यास, हाव.
Avocation अॅव्होकेशन् n.--- पेशा, काम, धंदा.
Avoid अॅव्हाॅइड् v.t.--- टाळणे, चुकविणे, वर्जणे, दूर करणे.
Avoidable अॅव्हाॅइडेबल् a.--- वर्ज्य करण्याजोगा.
Avouch अॅव्हाउच् v.t.--- प्रतिज्ञेने / निश्चयाने सांगणे.
Avow अॅव्हाउ v.t.--- अंगावर घेणे, स्वीकारणे, उघडपणे कबूल करणे.
Avowal अॅव्हावल् n.--- स्वीकार, अंगिकार, प्रतिपादन.
Avowedly अॅव्हाउड्लि ad.--- सांगून सवरून.