Cone-Conf

cone कोन् n.--- सुळका, शंकु.
confabulate कॉन्फॅब्युलेट् v.t.--- संवाद/संभाषण/गप्पा/गोष्टी. वाटाघाटी करणे.
confabulation कॉन्फॅब्युलेशन् n.--- संवाद, वाटाघाट, गोष्टी.
confection कॉन्फेक्शन् n.--- हलवा, मुरंबा, मिठाई.
confectioner कॉन्फेक्शनर् n.--- हलवाई, मिठाईवाला.
confederacy कॉन्फिडरसि n.---
confederate कॉन्फिडरेट् v.t.---जूट, मंडळ.
confederation कॉन्फिडरेशन् n.--- कट, तह, संगनमत.
confer कॉन्फर् v.i.--- संभाषण करणे, बोलणे. v.t.--- देणे, अर्पण करणे.
conference कॉन्फरन्स् n.--- संभाषण, सभा, बैठक.
confess कन्फेस् v.t.--- कबूल करणे, पदरी घेणे. confess to - (आरोप इ.) कबूल करणे.
confessedly कॉन्फेसेड्लि ad.---
confession कन्फेशन् n.--- अपराधाची/गुन्ह्याची कबुली, कबुलीजबाब.
confessional कन्फेशनल् n.--- धर्मगुरूसमोर अपराध मान्य करण्याचे निवेदन करण्याची जागा, असे निवेदन करण्याची चाल.
confessor कन्फेसर् n.--- स्वीकारणारा, कबूल करणारा.
confidant कॉन्फिडँट् n.--- सखा, एकांत रहस्यमित्र , विश्वासपात्र.
confidante कॉन्फिडंट् n.--- जिवलग मैत्रीण, सजणी.
confide कन्फाइड् v.t.--- पूर्ण विशवास टाकणे, -ला विश्वासात घेऊन सांगणे, -वर विश्वासपूर्वक सोपविणे. v.i.--- Confide in - -वर विश्वास टाकणे, विश्वास ठेवणे.
confidence कॉन्फिडन्स् n.--- विश्वास, खात्री, दम, उमेद, (आत्म-)विश्वास-युक्त.
confident कॉन्फिडन्ट् a.--- विश्वास ठेवणारा, निःशंक, उमेदीचा.
confidential कॉन्फिडेन्शिअल् a.--- विश्वासक, गुप्त ठेवावयाचा, गुप्त.
configurate कॉन्फिग्यूरेट्, Configure कॉन्फिगर् v.t.--- विशेष आकार देणे.
configuration कॉन्फिग्यूरेशन् n.--- रचना, घटना, आकार.
confine कन्फाइन् v.t.--- हद्द करून देणे, कैद करणे.
confinement कन्फाइन्मेंट् n.--- सीमा, मर्यादा, बाळंतपण, कैद, बंदी, आकळणे.
confirm कन्फर्म् v.t.--- मंजूर करणे, बळकट/पक्का करणे.
confirmation कन्फर्मेशन् n.--- पुष्टि, धृढता, बहाली.
confiscate कॉन्फिस्केट् v.t.--- दंडादाखल जप्त करणे.
confiscation कॉन्फिस्केशन् n.--- जप्ती, दान्डार्थ हरण.
conflagration कॉन्फ्लेग्रेशन् n.--- आगीचा डोंब/ लोळ/भडका, मोठी विनाशी आग.
conflate कन्फ्लेट् v.t.--- एकत्र करणे, जोडणे, मिसळणे. दोन किंवा अधिक ग्रंथ/कल्पना एकत्र जोडणे. eg. People often conflate contraception with abortion.
conflict कॉन्फ्लिक्ट् v.i.--- झुंजणे, लढणे, विरुद्ध असणे. n.--- झोंबी.
conflicting कॉन्फ्लिक्टिंग् a.--- प्रतिकूल, विरुद्ध.
confluence कॉन्फ्लूअन्स् n.--- जमाव, संगम, संमेलन, नद्यांचा संगम; अशा संगमाचे स्थळ.
confluent कॉन्फ्लूअन्ट् a.--- मिळणारा, संकीर्ण.
conflux कॉन्फ्लक्स् n.--- जमाव, गर्दी, संगम, संघ.
conform कन्फॉर्म् v.t.--- सारखा करणे, -शी जुळवून/जमवून घेणे, -शी सुसंवाद साधणे. Conform to - च्या अनुसार वागणे, -चे पालन करणे. v.i.--- अनुसरणे.
conformable कन्फॉर्मेबल् a.--- सारखा, अनुरूप.
conformableness कन्फॉर्मेबल्नेस् n.--- सारखेपणा.
conformance कन्(कॉन्)फॉर्मन्स् n.--- जमवून/जुळवून घेण्याची क्रिया, सुसंवाद.
conformism कन्(कॉन्)फॉर्मन्स् n.--- नियम/रूढि-/प्रथा -अनुसार वागण्याची निष्ठा, रूढिनिष्ठा.
conformist कन्(कॉन्)फॉर्मिस्ट् n.--- रूढिनिष्ठ.
conformity कन्फॉर्मिटि n.--- सादृश्य, मिलाफ, अनुरूपता, नियम-/मूल्य- अनुसारिता. ‘In conformity with’ - -च्या अनुसार, -ला अनुसरून.
confound कन्फाउन्ड् v.t.--- गोंधळविणे, घाबरविणे, थक्क करणे, वाताहत करणे, भांबविणे, धिक्कारणे, नाकारणे, अमान्य करणे. (उद्गारवाचक) ‘धिक्कार असो’ (संस्कृत: धिक्).
confounder कन्फाउन्डर् n.--- गलबल्या, घालमेल्या.
confront कन्फ्रंट् v.t.--- समक्षासमक्ष करणे, समोरासमोर आणणे.
confuse कॉन्फ्यूज् v.t.--- गोंधळ/धांदल करणे.
confute कॉन्फ्यूट् v.t.--- खंडणे, खोटा पाडणे.