inhabit इन्हॅबिट् v.t.--- राहणे, वस्ती करणे, नांदणे.
inhabitable इन्हॅबिटेबल् a.--- राहण्यासारखा, लायक.
inhabitant इन्हॅबिटन्ट् n.--- राहणारा, वस्ती करणारा.
inhabitation इन्हॅबिटेशन् n.--- वस्ती, राहणे, घर.
inhalation इन्हेलेशन् n.--- श्वास घेण्याची क्रिया, श्वासाबरोबर आंत घेण्याची क्रिया. पहा: ‘exhalation’.
inhale इन्हेल् v.t.--- श्वासाबरोबर घेणे, श्वास घेणे.
inhere इन्हियर् v.i.--- अंतर्गत होऊन राहणे, -चा अंगभूत असणे.
inherent इन्हीरन्ट् a.--- स्वाभाविक, मूळचा, अंतस्थ, अंगभूत, स्वभावगत, सहज.
inherit इन्हेरिट् v.t.--- अनुवंशतेने प्राप्त होणे.
inheritance इन्हेरिटन्स् n.--- वारसा, वतन, वतनदारी.
inheritor इन्हेरिटर् n.--- वारसदार, वारस.
inhibition इनिबिशन् / इन्हिबिशन् n.--- रोख, निरोध, बंदी, नियंत्रण, संयम, दुष्कृत्य करण्यास वाटणारा स्वाभाविक संकोच, पापभय, निषिद्ध-भय, मानसिक दडपण.
inhibitory इन्हिबिटोरी a.--- ‘inhibition’ -विषयक / -संबंधी.
inhuman इन्ह्यूमन् a.--- राक्षसी, दुष्ट, अमानुष.
inhumate इन्ह्यूमेट् v.t.--- जमिनीत पुरणे, गाडणे.
inimical इनिमिकल् a.--- द्वेषाचा, प्रतिकूल, हितशत्रु.
inimitable इनिमिटेबल् a.--- अप्रतिम, अद्वितीय.
iniquitous इनिक्विटस् a.--- अन्यायाचा.
initial इनिशिअल् a.--- पहिला. n.--- नावाचा पहिला वर्ण.
initiate इनिशिएट् v.t.--- आरंभ करणे, उपदेश करणे.
inject इन्जेक्ट् v.t.--- आत टाकणे / घालणे.
injection इन्जेक्शन् n.--- पिचकारीने घालण्याचे औषध.
injudicious इन्जुडीशस् a.--- अविचारी, अविवेकी.
injunction इन्जंक्शन् n.--- आज्ञा, ताकीद, हुकूम.
injure इन्जुअर् v.t.--- अपकार / नुकसानी करणे, दुःख देणे, जुलूम / इजा करणे, दुखापत करणे.
injury इन्जरि n.--- अपकार, उपद्रव, पीडा, त्रास, दुःख, जुलूम, अपाय, क्षति, हानि.
injustice इन्जस्टिस् n.--- अन्याय, अधर्म, अनीति.
ink इन्क् v.t.--- शाईने भरणे / भरविणे. n.--- शाई.
inkstand इंकस्टॅन्ड्, Inkhorn इंकहॉर्न् n.--- दौत.
inkle इंकल् n.--- नवार. v.t.--- अटकळ करणे.
inland इन्लन्ड् a.--- मध्यदेशाचा, मुलकी, देशांतल, समुद्रापासून दूर, परदेशी नाही असा.
inlet इन्लेट् n.--- वाट, मार्ग, द्वार, खाडी, प्रवेश.
inmate इन्मेट् a.--- सहवासी, सोबतीने राहणारा.
inmost इन्मोस्ट् a.--- सर्वांहून आतला, हृद्गत, मनात खोल रुजलेला.
inn इन् n.--- भटारखाना, खानावळ, सराई, इंगलंडातील कायद्याची पाठशाळा.
innards इनड्झ् n.--- पोटाच्या अंतर्भागातील इंद्रिये / अवयव. आतडी, कोथळा, अंतर्भाग. (I tried to help him find his way in the corruption-infected innards of Delhi).
innate इन्नेट् a.--- जातीचा, सहज, स्वाभाविक, उपजत, जन्मजात.
innings इन्निग्झ् n.--- डाव, खेळण्याची पाळी (क्रिकेट).
innkeeper इन्कीपर् n.--- भाटाऱ्या, खाणावळ्या.
innocence इन्नोसेन्स् n.--- निरुपद्रवीपणा, गरीबी.
innocent इन्नोसेन्ट् a.--- निर्दोषी, निरपराधी, निर्मल.
innocuous इन्नॉक्युअस् a.--- अविकारी, निरुपद्रवी.
innovation इन्नोव्हेशन् n.--- फिरवाफिरव, नवी रीत.
innovative इन्हवेटिव् a.--- नावीन्यपूर्ण, नावीन्यप्रवण.
innuendo इन्युएण्डो n.--- परोक्षपणे सूचित अर्थ. ध्वनितार्थ, ध्वन्यर्थ, ध्वनि (विशेषतः अपवाद वा आरोप या स्वरूपाचा), टीकास्पद सूर, टोमणा.
innumerable इन्न्यूमरेबल् = Innumerate. असंख्य, बेसुमार.
innumerate इन्न्यूमरेट् a.--- संख्याज्ञानविहीन. (The real reason is the shaming/poor quality of state education in England which leaves hundreds of thousands illiterate and innumerate.)
innumerous इन्न्यूमरस् = Innumerate.
inoculate इनॉक्युलेट् v.t.--- देवी / फोड्या काढणे.
inoculation इनॉक्युलेशन् n.--- देवी काढणे / टोचणे.
inoffensive इन्आॅफेन्सिव्ह् a.--- गरीब, बापडा.
inopportune इनॉप(र्)च्यून् a.--- अकालिक, अकालीन, अवेळीचा, गैरसोयीचा.
inordinate इन्आॅर्डिनेट् a.--- अमर्याद, बेहददीचा,
inorganic इन्आॅर्गॅनिक् a.--- निर्जीव, अप्राणी. जीवसृष्टीहोऊन वेगळ्या पदार्थांपासून (खनिज इ. पासून) बनलेला, अशा पदार्थासंबंधीचा. अशा पदार्थांचा अभ्यास करणाऱ्या रसायनशास्त्रशाखेसंबंधीचा. नैसर्गिक वाढीशी / उत्पत्तीशी संबंधित नसलेला.