Road रोड् n.--- रस्ता, मार्ग, वाट, पथ.
Road-metal रोड्मेटल् n.--- खडी.
Roam रोम् v.t.--- हिंडणे, भटकणे. n.--- भ्रमण, हिंडन.
Roar रोअर् v.i.--- गर्जना करणे, डरकणे, खोखो हसणे, आरोळी मारणे, गडगडणे, शिरा ताणून बोलणे. n.--- गर्जना, डुरकणी, आकांत, ओरड, आरोळी, कल्लोळ, दणका.
Roast रोस्ट् v.t.--- भाजणे, रेवडी उडवणे. a.--- भाजका.
Rob रॉब् v.t.--- चोरणे, हिराऊज घेणे, लुबाडणे.
Robber रॉबर् n.--- चोर, लुटारू, दरोडेखोर.
Robbery रॉबरी n.--- चोरी, लूट, अपहार, लुटणे.
Robe रोब् v.t.--- झगा / पोषाख घालणे. n.--- झगा, पोषाख. पायघोळ अंगरखा, कफनी.
Robot रोबॉट् n.--- यंत्रमानव (माणसाचे रूपांतील यंत्र). भावनाहीन / मन-बुद्धि-चित्त-अहंकार-रहित व्यक्ति.
Robust रोबस्ट् a.--- धट्टाकट्टा, जोरदार, सुदृढ, निकोप व मजबूत.
Rock रॉक् v.t.--- झोके देणे, डोलवणे. n.--- खडक, शिळा, दगड, संकटाचे कारण, आश्रय.
Rocket रॉकेट् n.--- बाण, तारा, अग्निबाण.
Rockoil रॉक्आॅइल् n.--- रॉकेल, खडकेल, घासलेट.
Rod रॉड् n.--- काठी, छडी, दंड, सोटा.
Rodeo रोडिओ n.--- गुरे हाकारण्याची / तयार करण्याची प्रक्रिया; गुरांना हाकारणे / तयार करणे इ. चा खेळ / तमाशा / प्रदर्शन.
Roe रो n.--- हरिणी, माशाची अंडी.
Rogue रोग् n.--- लबाड, सोदा, गुलाम, लुच्चा. n./a.--- मोकाट सुटलेला / उद्दाम (प्राणी इ.).
Roister रॉय्स्ट(र्) v.i.--- मौजमजेचा धुडगूस / धिंगाणा घालणे, जल्लोष करणे.
Role रोल् n.--- (समाजात इ.) वाट्यास आलेले / अपेक्षित काम / भूमिका. नाटक इ. मधील विशिष्ट भूमिका / सोंग / अशा सोंगाची व्यक्ति.
Roll रोल् v.t.--- गुंडाळणे, लोळवणे, गरगर फिरवणे. n.--- गुंडाळी, वळकटी, पट, यादी, गुंडी, धडाका, दणका.
Roller रोलर् n.--- लाट, लाटणे, वरवंटा, लोटणारा.
Roller-coaster रोलर्कोस्टर् n.--- वक्राकार तीव्र चढ उतारांच्या रुळांचा लोहमार्ग.
Rollic रॉलिक् v.i.--- आनंदात / मौजेत / गमतीत / हसतखेळत वेळ घालविणे, बागडणे.
ROM रॉम् n.--- संक्षीप रूप ‘Read-Only-Memory’ चे. संगणकांतील केवळ वाचण्याची अपरिवर्तनीय स्मृति / माहिती. पहा : RAM
Romance रोमॅन्स् n.--- कादंबरी, अद्भुत कथा, रम्यकथा. अद्भुत-कल्पना-शक्ति, अद्भुतनिर्मितिप्रतिभा. v.t.--- रम्यकथा रचून इ., -चे स्तोम माजवणे. v.i.--- रम्य कल्पनांत / स्वप्नरंजनांत गुंगणे.
Romantic रोमॅन्टिक् a.--- अद्भुत, काल्पनिक, कादंबरीसारखा.
Romp रॉम्प् v.i.--- धांगडधिंगा घालणे, हुंदडणे. n.--- धांगडधिंगा, हमामा.
Rood रूड् n.--- काठी.
Roof रूफ् v.t.--- छप्पर / छावणी लावणे. n.--- छप्पर, कौलार.
Rook रूक् n.--- कावळा, फसव्या, बुद्धिबळातील हत्ती.
Rookery रूकरी n.--- (कावळे, समुद्राश्रयी पक्षी / प्राणी यांचे) वसतिस्थान / अंडी घालण्याची / उबवण्याची जागा. हीन वस्त्यांचे / घरांचे संकुल, झोपडपट्टी.
Rookie रूकी n.--- नुकताच / नव्याने भरती झालेला (सैनिक / सेवक). नवशिका (मनुष्य). नवखा (इसम). नवागत (माणूस). नवा / नवखा कर्मचारी / कार्यकर्ता / खेळाडू. (eg. Raju, unlike his father, is a political rookie).
Room रूम् n.--- कोठडी, खोली, जागा, सवड.
Roomily रूमिलि ad.--- ऐसपैस, अघळपघळ.
Roost रूस्ट् (to rule the roost) v.i.--- अधिकार गाजविणे. बसणे, थारावणे. n.--- थारा, पाखरांचे रात्रीचे थाऱ्याचे ठिकाण.
Root रूट् v.t.--- मूळ धरणे, नांगी रुतणे, बद्धमूल करणे. n.--- मूळ, बुडखा, बीज, मूळशव, धातु. Root for: -चा पाठपुरावा करणे, उदोउदो करणे. Root out - उपटणे, उन्मूलन निर्मूलन करणे.
Rope रोप् n.--- दोर, काढणी, दोरी, रस्सी. (pl.) --- आंतडी.
Ropiness रोपिनेस् n.--- दोराळपणा, चिकटपणा.
Rosary रोझरी n.--- जपमाळ. (जपमाळ इ. च्या साधनांनी केलेला) विशिष्ट धार्मिक जप / पाठ / प्रार्थना. = Rosery.
Rose रोज् n.--- गुलाबाचे झाड, गुलाबी रंग, गुलाब.
Rose-apple रोज्-अॅपल n.--- जांभूळ, जांभळाचे झाड.
Rosery रोजरि n.--- गुलाबाची बाग / तीमधील गुलाबाचा कुंज. = Rosary
Rosin रोझिन् n.--- राळ. v.t.--- राळ लावणे.
Roster रॉस्ट(र्) n.--- क्रम / पाळी दाखविणारी यादी / सूचि.
Rot रॉट् v.i.--- कुजवणे, सडणे, सडवणे. n.--- कुजणे, कीड.
Rota रोट n.--- (लोकांची / कामाची) दर्शविणारी यादी.
Rotary रोटरी a.--- आसाभोवती फिरणारा. गोलाकार / चक्राकार पाळीने चालणारा.
Rotate रोटेट् v.i.--- आसा- / केंद्रा- भोवती फिरणे; विशिष्ट पाळी- / क्रमा- ने चालणे.
Rotation रोटेशन् n.--- चक्राकार आवृत्ति / पाळी / क्रम. गरगरणे, परिभ्रमण. चक्रानुक्रम, चक्रनेमिक्रम.
Rotatory रोटेटरि a.--- परिभ्रमणाचा, पाळीने येणारा.
Rote रोट् n.--- घोकणी, धोशा, अर्थावीण पाठांतर, यांत्रिक घोकंण. By rote : यांत्रिकपणे, (अर्थहीन) पाठांतरद्वारा. Rote learning: घोकंपट्टी / पाठान्तर यावर आधारलेले अध्ययन.
Rote-learning रोट्-लर्निंग्
Rotten रॉटन् a.--- सडलेला, कुजका, घाणेरडा, दूषित, पतित.
Rotunda रोटण्डा n.--- घुमटाची गोलाकार इमारत.