inborn इन्बॉर्न् a.--- जन्मसिद्ध, सहज, जन्मजात, उपजत.
inca इंका n.--- दक्षिण अमेरिकेतील पेरू (Peru) देशांत इ.स. च्या १६ व्या शतकात त्या देशावर झालेल्या स्पॅनिश लोकांच्या आक्रमणापूर्वीपर्यंत राज्य करणाऱ्या घराण्यातील व्यक्ति.
incandescent इन्कॅण्डेसण्ट् a.--- प्रकाशमय, दीप्तिमय, देदीप्यमान, तप्ततेजोमय, दाहक व तेजस्वी. संतप्त.
incantation इन्कॅन्टेशन् n.--- मंत्र, मोहिनी, मंत्रोच्चार, मंत्रपठन.
incapacity इन्कॅपॅसिटि n.--- बुद्धिमांद्य, नालायकी, अक्षमता.
incarcerate इन्कार्सिरेट् v.t.--- तुरुंगात टाकणे, बंदिस्त करणे, कोंडून ठेवणे.
incarceration इन्कार्सिरेशन् n.--- तुरुंगवास, कारावास.
incarnate इन्का(र्)नेट् a.--- अवतारी, मूर्तिमान. V.t.--- -ला देहधारी/मूर्तिमंत करणे.
incarnation इन्कार्नेशन् n.--- अवतार, देहधारी (तेज, शक्ती, इ.), (ईश्वर इ. चे) शरीरधारी रूप.
incase इन्केस् v.t.--- वेष्टन / गवसणी घालणे.
incendiary इन्सेन्डिअरि n./a.--- आगलाव्या, अग्निद, कळीचा नारद, दाहकारी द्रव्य / वस्तु.
incense इन्सेन्स् v.i.--- धूप दाखविणे. n.--- धूप, ऊद.
incentive इन्सेंटिव्ह् n.--- उत्तेजन, उत्तेजक.
inception इन्सेप्शन् n.--- प्रारंभ, सुरवात.
inceptive इन्सेप्टिव्ह् a.--- ‘Inception’ -चा / -विषयक, प्रारंभिक, प्रारंभवाचक (उदा: inceptive particle ‘अथ’).
incessant इन्सेसण्ट् a.--- सतत चालणारा, अखंड, निरंतर.
incest इन्सेस्ट् n.--- अगम्यागमन, विशिष्ट नातेसंबंधामुळे परस्परांशी विवाहास अपात्र असलेल्या स्त्रीपुरुषांतील शरीरसंबंध. अवैध/अनैतिक शरीरसंबंध.
incestuous इन्सेस्च्युअस् a.--- ‘Incest’ चा दोषी, ‘incest’ च्या स्वरूपाचा.
inch इंच् (pl. Inches इंचिस्) n.--- लांबी (उंची, खोली, रुंदी, विशिष्ट क्षेत्रात झालेली पर्जन्यवृष्टि, हिमपात आदिचा विशिष्ट काळांत साठलेला थर आदि) मोजण्याचे एक माप : १/३६ वार (यार्ड) अथवा २५. मिलिमीटर. लहान अंतर/अंश/मान. v.--- अल्प प्रमाणात वेग/तीव्रता कमी/अधिक करीत जाणे/हालणे/चालविणे.
incher इंचर् n.--- प्रमाण अल्पांशांनी कमीजास्त करण्याची कळ/उपकरण.
inchoate इंकोएट् a.--- बाल्यावस्थेतील, अपूर्ण, अपरिपक्व.
incident इन्सिडेंट् a.---
incinerate इन्सिनरेट् v.t.--- जाळून भस्म करणे / करविणे.
incineration इन्सिनरेशन् n.--- भस्मीकरण / भस्मीभवन.
incinerator इन्सिनरेटर् n.--- दाहयंत्र, कागद वगैरे जाळून नष्ट करण्याचे यंत्र. जाळून भस्म करण्याचे यंत्र/भट्टी.
incipient इन्सिपिअण्ट् a.--- प्रारंभावस्थेतील, बाल्यावस्थेतील.
incise इन्साइज् v.t.--- कापणे, छेदणे, कासणे, कोरणे.
incision इन्सिजन् n.--- छेद.
incisive इन्साय्सिव्ह् a.--- कापणारा, छेदणारा, भेदक, धारदार, रोखठोक.
incite इन्साइट् v.t.--- भर देणे, चिथावणे.
inclement इन्क्लेमंट् a.--- (हवामान इ.) कडक, तीव्र, उग्र.
inclination इन्क्लिनेशन् n.--- कल, प्रवृत्ति, वासना.
incline इन्क्लाइन् v.t.--- कलणे, झुकणे. v.i.--- मन वळवणे / कलवणे. n.--- उतरण, उतार.
include इन्क्ल्यूड् v.t.--- आत घेणे, समावेश करणे.
inclusion इन्क्ल्यूजन् n.--- समावेश, अंतर्भाव, धरणे.
incognito इन्कॉग्निटो a.--- गुप्त वेषातील, न ओळखू येणारा. वेशांतरामध्ये, अज्ञातपणे, गुप्ततेने, वेशान्तरावस्था.
incoherent इन्कोहिरन्ट् a.--- असंयुक्त, अलग.
incombustible इन्कम्बस्टिबल् a.--- न जळणारा.
income इन्कम् n.--- प्राप्ति, उत्पन्न, मिळकत, आदा.
incommensurate इन्कॉमेन्शुरेट् a.--- कमी परिणामाचा, अपुरा.
incommode इन्कॉमोड् v.t.--- उपद्रव / इजा करणे.
incommunicado इन्कम्यूनिकाडो a./ad.--- संपर्क / संवाद (-साधन-) हीन/रहित (अवस्थेत/रीतीने), संपर्कातीत / बंद / एकांतबद्ध (अवस्थेत).
incommunicative इन्कम्युनिकेटिव्ह् a.--- खोल मनाचा, आतल्या गांठीचा, मख्ख.
incompact इन्कॉम्पॅक्ट् a.--- विरळ, विलग.
incomparable इन्कॉम्पेरेबल् a.--- अनुपमेय, अप्रतिम.
incompatible इन्कॉम्पॅटिबल् a.--- विपरीत, विसंगत, न जुळणारा.
incompatibility इन्कॉम्पॅटिबिलिटि n.--- न जुळण्याची / मेळ नसण्याची स्थिति / अवस्था.
incompetence इन्कॉम्पिटन्स् n.--- नालायकी.
incompetent इन्कॉम्पिटन्ट् a.--- अयोग्य, नालायक.
incomplete इन्कम्प्लीट् a.--- अपूर्ण, तुटक, उणेपणा.
incomprehensible इन्कॉम्प्रिहेन्सिबल् a.--- गूढ, गहन, दुर्बोधक.
inconclusive इन्कन्क्ल्यूझिव्ह् a.--- अनिर्णायक.
incongruity इन्काँग्र्युइटि n.--- विजोडपणा, असंभव, विसंगति, विसंवाद.
incongruous इन्काँग्रुअस् a.--- विसंवादी, विसंगत, विजोड.
inconsiderable इन्कन्सिडरेबल् a.--- थोडे, जमा न धरण्याजोगे, क्षुद्र, क्षुल्लक, अगण्य.
inconsiderate इन्कन्सिडरेट् a.--- अविचारी.
inconstancy इन्कन्स्टन्सि n.--- चंचळपणा, व्यभिचार.
inconstant इन्कॉन्स्टन्ट् a.--- चंचल, क्षणिक.
incontestable इन्कॉन्टेस्टेबल् a.--- अखंडनीय.
incontinent इन्कॉन्टिनन्ट् a.--- व्यभिचारी, संयमहीन, स्वैर.
inconvenience इन्कन्व्हीनिअन्स् n.--- गैरसोय, नड.
inconvenient इन्कन्व्हीनिअन्ट् a.--- गैरसोयीचा.
inconvertible इन्कन्व्हर्टिबल् a.--- रूपांतर न करता येणारा, केवळ एकरूपी.
incorporate इन्कॉर्पोरेट् v.t.--- मिसळून एक करणे.
incorporeal इन्कॉर्पोरिअल् a.--- विदेही.
incorrect इन्करेक्ट् a.--- अशुद्ध, चुकीचा.
incorrectly इन्करेक्ट्लि ad.--- अशुद्ध, अन्यथा.
incorrigible इन्कॉरिजिबल् a.--- कोडगा.
incorrupt इन्करप्ट् a.--- स्वच्छ, पवित्र.
incorruptible इन्करप्टिबल् a.--- अविनाशी.
increase इन्क्रीझ् v.t.--- चढविणे, वाढविणे. n.--- वाढ, बढती. v.i.--- वाढणे, चढणे, अधिक होणे.
incredible इन्क्रेडिबल् a.--- विश्वास न ठेवण्याजोगा.
incredulity इन्क्रेड्यूलिटि n.--- अविश्वास, अश्रद्धा.
increment इन्क्रिमेंट् n.--- वाढ, वृद्धि, वाढावा.
incriminate v.t.--- गुन्ह्याचा आरोप करणे, दोषारोप करणे, गुन्ह्यात गोवणे, गुन्ह्याशी संबंध आहे असे दाखविणे.
incriminating a.--- गुन्हेगारीची, फसवणुकीची, गंभीर.
incrust इन्क्रस्ट् v.t.--- पूट देणे, कवच चढविणे.
incubus इन्क्यूबस् n.--- कुस्वप्न, दुष्टस्वप्न. झोपेत पछाडणारे विकृत विचारांचे / वर्तनाचे पिशाच्च.
inculcate इन्कल्केट् v.t.--- पुनःपुनः सांगून पढविणे / अंगी मुरविणे (पहा: ‘instil’).
inculpate इन्कल्पेट् v.t.--- दोषाने आरोपित करणे, -वर आरोप ठेवणे.
incumbent इन्कम्बन्ट् n.---आवश्यक, जरूर, कर्तव्य, विशिष्ट पद वा अधिकार धारण करणारा / यांवर नियुक्त केलेला किंवा त्यावर कार्यशील (व्यक्ति). a.---
incur इन्कर् v.t.--- आपणावर ओढणे, पदरी घेणे.
incursion इन्कर्शन् n.--- आक्रमण, अतिक्रमण.
incursive इन्कर्सिव् a.--- आक्रमक, अतिक्रमणशील, घुसखोर.