far-fau

far फार् ad.--- दूर, लांब. a.--- दूरचा, लांबचा, तुटक.
farce फार्स् n.--- नकलेचा खेळ, नाटक, प्रहसन, विडंबन, थट्टा, चेष्टा (see) Forcemeat a.--- n.--- विचित्र / चमत्कारिक कथा प्रसंगांनी युक्त नाट्य, तमाशा, हास्यास्पद स्थिति / घटना / कृत्य
far cry फार् क्राय् n.--- दीर्घ अंतर, दूरचा पल्ला, मोठा कालावधि
fare फेअर् n.--- भडे, मोल, खाणे, अन्न, जेवण, उपभोग्य, सेव्य वस्तु.
farewell फेअरवेल् inter.--- कल्याण असो ! नमस्कार! यावे ! n.--- निरोप, आज्ञा.
farina फॅरीन्,n.--- फॅराइन् पठि, पराग, पुष्परेणु, फुलातील रजःकण
farinaceous फॅरिनेशिअस् a.--- पिठाचा, पिष्टमय
farm फार्म् n.--- धार्याने दिलेली जमीन, शेत, गुत्ता, v.t.--- मक्ता नांगरणे, लागवड करणे, जोपासणे पालनपोषण करणे.
farm out v.t.--- एखादे आपले काम कंत्राटाने भाड्याने मक्त्याने ठेक्याने देणे
farmer फार्मर् n.--- शेतकरी, खोत, इजारदार.
farming फार्मिंग् n.--- शेती, खोती.
farm-labourer फार्म-लेबरर् n.--- शेतकरी.
farraginous फॅरराजिनस् a.--- पंचमेळीचा, मिश्र.
farrier फॅरिअर् n.--- नालबंद, घोड्याचा वैद्य, अश्ववैद्य.
farrago फरागो n.--- गोंधळगर्दी, घोळ, काला, खिचडी
farther फार्दर् a. & ad.--- अधिक दूर, दूरवर.
farther most फार्दरमोस्ट a.--- सर्वांहून दूर
farthing फार्दिंग् n.--- एक अगदी हलके इंग्रजी नाणे.
farwide फार्वाईड् a.--- सर्वत्र
fascinate फॅसिनेट् v.t.--- भारणे,मोह घालणे, वेडावून टाकणे.
fascination फॅसिनेशन् n.--- भुरळ,जादू मोहिनी नितांत आवड / ओढ / आकर्षण
fascism फॅसिझम् / फॅसि. / फासि. .--- समाजवाद- / साम्यवाद-विरोधी, वंश नि राष्ट्र यांबद्दल अभिमान निष्ठा बाळगणारी, केन्द्रीभूत, बलिष्ठ, हुकुमशाहीप्रवण राज्यशासनाची समर्थक, पहिल्या जागतिक महायुद्धात (इ.स.१९१४ - १९१८) इटलीत जन्मलेली व इ.स.१९१९ मध्ये बेनिटो मुसोलिनी (Benito Mussolini) याच्या नेतृत्वाने तेथे प्रथम व नंतर जर्मनी इ. अन्य देशात पुरस्कृत झालेली, राजकीय विचारसरणी. कट्टर,आक्रमक, बलोपासक, राष्ट्रवादी विचारधारा. फासीवाद (हिंदी).
fascist फॅसिस्ट् / फॅशिस्ट् n.--- fascism पद्धतीचा पुरस्कर्ता, त्या विचारसरणीच्या संघटनेचा सदस्य.
fashion फॅशन् v.t.--- करणे, घडणे, बनवणे. n.---परिपाठ, रीत,आकार, डौल, तऱ्हा, घाट.
fashionable फॅशनेबल् a.--- शिष्टसंप्रदायाचा सभ्य, थाटामाटाने / डौलाने राहणारा.
fast फास्ट् v.i.--- उपास करणे, अनावाचून राहणे ad.--- लौकर n--- उपास a.--- जलद, घट्ट, गच्च, बळकट.
fasten फासन् v.t.--- बळकट-जखडून बांधणे.
fastidious फॅस्टिडिअस् a.--- खोडकर, चोखंदळ, अतिचिकित्सक, मिजासखोर.
fastidiousness फास्टीडियस्नेस् n.--- (अति) चोखंदळपणा, अतिचिकित्साखोरी, मिजास् /ज्(खोरी)
fasting फास्टिग् n.--- उपोषण, निराहार.
fastness फास्टनेस् n.--- बळकटी, गच्चपणा.
fat फॅट् a.--- लट्ठ, पुष्ट, चिकट, सुपीक n.--- चरबी.
fatal फेटल् a.--- प्राणघाती, दैवाचा, घातकी.
fatality फेटॅलिटी n.--- दैव, दुर्गति, दैवाधीनता.
fate फेट् n.--- दैव, प्रारब्ध, प्राक्तन, अंत, शेवट.
fateful फेटफुल् a.--- विधिसंकुल, दैवसंकुल, निर्णायक ऐतिहासिक घडामोडीचा.
father फादर् n.--- बाप, पिता, जनक.
father-in-law फादर् - इन् - लॉ n.--- सासरा, श्वशुर.
fatherland फादरलँड् n.--- स्वदेश, जन्मभूमि.
fatherless फादर्लेस् a.--- पोरका, पितृहीन.
fathom फॅदम् n.--- सहा फुटांचे माप, वांव,v.t.--- मापणे, मोजणे, थांग लावणे,तळापर्यंत जाणे
fatigue फटीग् v.t.--- शिकवणे, थकवणे. n.--- शीण, ग्लानि, श्रम,कष्टाचे काम करतांना घालायचा गणवेश
fatten फॅटन् v.t.--- पुष्ट-लट्ठ करणे, माजणे, अंगाने भरणे, पोसणे.
fatuous फॅट्युअस् n.--- मूर्ख, वेडा, बुद्धिहीन, वेडपट.
fauces फॅसीझ् n.--- गळा, कंठ.
fault फॉल्ट् n.--- गुन्हा, अपराध, खोड, न्यूनपणा, कमताई, अभाव, हीनता, दुर्गुण, बिंग. v.i.--- चुकणे, चूक प्रमाद अपराध करणे v.t.--- ०ला दोष देणे, ०ला बोल लावणे, ०ला दोषी ठरविणे, ०वर ठपका ठेवणे
faulty फॉल्टि a.--- अपराधी, उणा, अपूर्ण, अपुरा, कोता, खोडकर.
fauna फॉना n.--- विशिष्ट प्रदेशातील किंवा काळातील प्राणिसमुदाय प्राणिजीवन (पशु-पक्षी)
faux फो a.--- खोटं, कृत्रिम, अनैसर्गिक; चुकीचे.
faux Pas फो पा (फ्रेंच वचन) n.--- चुकीचे पाऊल, चूक, प्रमाद, अनैतिक कृत्य