Lop-Lun

lop लॉप् v.t.--- तोडणे, छाटणे.
lop-sided लॉप्साइडेड् a.--- असमतोल, तोल गेलेला, विषम. वेडावाकडा, एकांगी.
lopping लॉपिंग् n.--- तोडणी, छाटणी.
loquacious लॉकेशस् a.--- वाचाळ, बडबड्या, तोंडाळ.
lord लॉर्ड् n.--- धनी, सरदार, उमराव, ईश्वर, नवरा.
lordlike लॉर्ड्लाइक् a.--- श्रीमंती, सरदारी.
lordship लॉर्ड्शिप् n.--- धनीपणा, स्वामित्व.
lore लोSर n.--- पूर्वापार चालत आलेले ठराविक लोकांजवळ असलेले विशेष प्रकारचे ज्ञान. विद्या, शिक्षण, शहाणपण, सल्ला. पहा - ‘folklore’
lorry लॉरी n.--- भूमीवरून माल वाहून नेणारे मोठे स्वयंगति / स्वयंचलित वाहन.
lose लूझ् v.t.--- हरवणे, मुकणे, हरणे, हार जाणे.
loser लूझर् n.--- हरणारा, चुकणारा.
loss लॉस् n.--- तोटा, नाश, हार, धक्का, खोट.
lost लॉस्ट् p.p.a.--- बहकलेला, हरवलेला, मुकलेला.
loth लोथ् a.--- = Loath
lothario लोथेरियो n.--- (एका नाटकाच्या पात्रावरून झालेले नाम) बदफैली / स्वैराचारी / चंगीभंगी माणूस.
lotion लोशन् n.--- औषधी पाणी.
lottery लॉटरी n.--- सोडत, जुगार.
lotus लोटस् n.--- कमळ, कमलिनी.
loud लाउड् a.--- मोठा, उंच. Loudly लाउड्लि ad.--- मोठ्याने.
lounge लाउन्ज् v.i.--- रिकामा बसणे, फिरणे. n.--- रिकामचाषडी, फड, अड्डा, भटक्या. रिकामपणी / वाट पहात असतां / आरामात बसण्याची जागा / कक्ष.
louse लाउस् n.--- ऊ, गोचीड, चिरू.
lousy लाउझी a.--- उवांनी बुजबुजलेला, हलकट, पाजी. घाण, गलिच्छ.
lout लाउट् a.--- अजागळ, अडाणी, मठ्ठ, ढ.
love लव्ह् v.t.--- प्रीति करणे, आघाडणे, आसक्त होणे. n.--- प्रीति, आवड, शोक, रति, मदन, शृंगार.
love-letter लव्ह् लेटर् n.--- प्रणयपत्रिका.
loveliness लव्हलिनेस् n.--- सौंदर्य, लावण्य, मनोहरता.
lovely लव्हलि a.--- सुंदर, रमणीय, रम्य, मोहक.
lover लव्हर् n.--- प्रीति करणारा, प्राणनाथ, वल्लभ.
lovesick लव्ह्सिक् a.--- कामविव्हल, विरहदुःखी.
loving लव्हिंग् a.--- मायाळू, प्रणयी, प्रेमळ.
low लो v.i.--- हंबरणे, हंबरडा फोडणे. n.--- हंबरणे, हंबरडा. a.--- पाजी, हलकट, सखल, खोल, उदासीन.
low-brow लोब्राउ n.--- अशिक्षितपणाचा, हलक्या बुद्धीचा, ही / हलक्या अभिरुचिचा.
lowborn लोबॉर्न् a.--- हीनकुल, हीनजात.
lowbred लोब्रेड् a.--- अशिक्षित, अडाणी.
lower लोअर् v.t.--- खाली आणणे, हलका करणे. a.--- धाकटा, धाकला, खालचा, आधार, अधिक ठेंगणा.
lowering लोअरिंग् a.--- भरून आलेला, अंधारीचा.
lowland लोलँड् n.--- तळघाट, तळजमीन.
lowly लोलि a.--- गरीब, भोळसट, हलका, नम्र.
lowness लोनेस् n.--- खोलपणा, नीचपणा, क्षुद्रता.
loyal लॉयल् a.--- राजनिष्ठा, पतिव्रता, एकपत्नी.
loyalty लॉयल्टि n.--- राजनिष्ठा, पातिव्रत्य, इमान.
lubbard लबार्ड् n.--- ढोंग्या, ठक, ढब्बू.
lubricate लुब्रिकेट् v.t.--- मऊ करणे, -ला वंगण करणे.
lucerne ल्यूसर्न् n.--- विलायती गावात.
lucid ल्यूसिड् a.--- चकचकीत, सुबोध, सोपा.
luck लक् n.--- दैव, नशीब, भाग्य, दैवयोग.
luckily लकिली ad.--- सुदैवाने.
luckless लक्लेस् a.--- दुर्दैवी, भाग्यहीन.
lucky लकी a.--- भाग्याची, अनुकूल, मंगल.
lucrative ल्यूक्रेटिव्ह् a.--- नफ्याचा, किफायतीचा.
lucre ल्यूकर् n.--- नफा, लाभ, प्राप्ति (गैरमार्गाने लाभलेला).
ludicrous ल्यूडिक्रस् a.--- हास्यास्पद, विनोदी.
lug लग् v.t.--- धरून ओढणे, फरफरावणे. n.--- कान, मूठ, ओढणे, ओझे, काठी.
luggage लगेज् n.--- (प्रवाशाचे) सामान, बाडबिछायत. अशा सामानाच्या पेट्या, पिशव्या, वळकट्या, गाठोडी, इ..
lugubrious ल्युग्युब्रियस् a.--- शोकार्त, शोकव्यापृत, रडवा, रड्या.
lukewarm ल्यूक्वॉर्म् a.--- कोमट, उदास, मंदोत्साह, अनास्थेचा, उदासीन.
lull लल् v.t.--- निजविणे, अंगाई करणे, शांतवणे.
lullaby ललबाय् n.--- पाळणा, अंगाई, गाई, जो जो, अंगाईगीत.
Lullingly ललिंग्लि ad.--- आळवून, गोंजारून, थोपटून.
lumbago लम्बेगो n.--- उसण, कटिवात, कंबरदुखी.
lumbar लंबर् a.--- नितंबाचा, पाठीच्या कण्याच्या खालील भागाचा.
lumber लंबर् n.--- अडगळ, निरुपयोगी सामान, कापलेले इमारती लाकूड. v.i.--- (भरभक्कम व्यक्तीचे) वजनदारपणे चालणे.
lumen ल्यूमेन् n.--- (pl. lumina) नळीत / बंद जागेत कोंडलेली पोकळी.
luminary ल्यूमिनरि n.--- तेजस्वी पदार्थ, वस्तु, ग्रह, चंद्रसूर्य.
luminous ल्यूमिनस् a.--- तेजस्वी, चकचकीत, सुबोध.
lump लम्प् n.--- डिखळ, गोळा, डल्ला, गड्डा, खडा. सुजेचा गोळा. जाड्या व्यक्ति. v.t.--- -ला (अन्य व्यक्ति / वस्तु व गटांशी / मध्ये) मिसळणे / जोडणे / समावेशिणे (All Arabs were lumped together in the camp of evil-doers)Lump in one’s throat - भावनावेगाने गळ्यांत / घशांत आलेला आवंढा, गळा दाटून येण्याची प्रक्रिया.
lumpen लम्पेन् a.--- गावंढळ, असभ्य नि मूर्ख.
lumpy लम्पी a.--- खडबडीत, ओबडधोबड, जाडजूड.
lunacy ल्युनॅसि n.--- वेड, चळ, उन्माद, भ्रांति.
lunar ल्युनर् a.--- चंद्राचा, चांदण्याचा.
lunatic ल्युनॅटिक् a.--- वेडा, वेड्याचा, भ्रमिष्ट.
luncheon लन्चन्, Lunch लन्च् n.--- फराळ, उपहार, अल्पहार, मधल्या वेळचे जेवण, मध्यान्ह भोजन.
lung लंग् n.--- फुफ्फूस.
lunge लंज् n.--- अचानक प्रहार / चाल / आक्रमण, धाव, प्रक्षेप. v.--- असा प्रहार / चाल, इ. करणे.
luny पहा ‘Loony’