Cure क्युअर् v.t.--- बरे/निरोगी करणे, मीठ घालणे. n.--- निरसन, उपाय, औषध.
Curè क्युअरे n.--- फ्रांसमधील प्रीस्ट (‘priest’) पदावरील धर्माधिकारी.
Curer क्युरर् n.--- बारा करणारा.
Curette क्यूअरेट् n.--- शरीराच्या आंतील पृष्ठभागावरील दूषित द्रव्ये शल्यक्रियेने निपटून काढण्याचे लहान खवणी-/कोरणी -सारखे उपकरण. v.--- ‘curette’ ने शस्त्रक्रिया करणे.
Curfew कर्फ्यू n.--- निर्धारित काळापुरती नगरांतील रस्त्यांवरून फिरण्याची बंदी, संचारबंदी.
Curio क्यूरिओ n.--- अभिनव/विलक्षण/दुर्मिळ वस्तु.
Curiosity क्यूरिआॅसिटि n.--- चौकसपणा, जिज्ञासा.
Curl कर्ल् v.t./v.i.--- वेटाळणे, कुरळे होणे, मुरड घालणे, पेंच देणे, लहरी येणे, वेटोळे घालणे/घालून बसणे. (शरीर, केस, ओठ, तोंड, इ.) ला गोलाकार/वर्तुळाकार/वक्राकार करणे/वळविणे/आकुंचिणे. n.--- कुरळे केस, केसांचे वेटोळे, बांक, तरंग.
Curly कर्लि a.--- कुरळ, कुरळा, बांकदार, नागमोडी, कुरळ्या केसाचा.
Currant करन्ट् n.--- वाळलेले द्राक्ष, एक लहान फळ.
Currency करन्सी n.--- परिपाठ, प्रचार, चलन, प्रचारांतील नाणे.
Current a.--- चलनी, परिपाठातला, जारी, चालता. n.--- ओढा, ओहोळ, धार, क्रम, प्रघात.
Curriculum करिक्युलम् n.--- (विशिष्ट वयोगटाचा सर्व विषयाचा) नेमून दिलेला अभ्यासक्रम, पाठ्यक्रम. (हिंदी: पाठ्यचर्या, पाठ्यक्रम). Curriculum vitae करिक्युलम् व्हाय्टी/ व्हीटाय् n.--- जीवनक्रम, जीवनालेख. एखाद्या व्यक्तीच्या प्रमुख वैशिष्ट्यांची नोंद करणारा लेख.
Currier करिअर् n.--- चांभार, साईस, मोतद्दार.
Curry / Currie करी n.--- रस-भाजी, रस्सा. मसाले घालून केलेले पाले-/फळ-भाजीचे / मांस इ. पदार्थाचे तोंडीलावणे. v.t.--- कमावणे, रापवणे, खरारा करणे. ‘Curry favour with’ -ची मर्जी संपादणे, -ला स्तुति इ. साधनांनी खूष करणे, -ची खुशामत करणे, -ला लोणी/मस्का लावणे.
Currycomb करिकोम् n.--- खरारा.
Curse कर्स् v.t.---शाप देणे. n.--- शाप, तळतळात.
Cursing कर्सिंग् n.--- शाप देणे, गालिप्रदान.
Cursive कर्सिव्ह् a.--- एका शब्दांतील वर्ण एकमेकास जोडून, धावत्या शैलीत/आकारात/हस्ताक्षरात, बहुशः/सामान्यतः उजवीकडे किंचित कललेल्या अक्षरात लिहिलेला. (पहा: ‘uncial’).
Cursor कर्सर् n.---
Cursory कर्सरी a.--- जलदीचा, सरासरी, वरवरचा, धावता, स्थूल स्वरूपाचा.
Curt कर्ट् a.--- संक्षिप्त, फाटाछाट केलेला, (भाषण, पत्र, इ.) अल्पाक्षरोद्धत, तुटक, तुसडा.
Curtail कर्टेल् v.t.--- उणा करणे, कापणे, संक्षेप देणे.
Curtail dog कर्टेल् डॉग n.--- लांडा कुत्रा.
Curtain कर्टन् n.--- पडदा.
Curtsy कर्ट्सि n.--- स्त्रीने केलेले नमन.
Curvaceous कर्व्हेशस् a.--- वक्ररूप, बांकदार.
Curvature कर्व्हेचर् n.--- बांक, वळण.
Curve कर्व्ह a.--- वाकडा, वक्र. v.t.--- वाकडा करणे. n.--- वाकडी रेघ, वक्ररेषा, धनुर्भाग.
Curvet कर्व्हेट् n.--- उडी, उड्डाण. v.i.--- ठेक्यावर चालणे.
Curvilinear कर्व्हिलीनिअर् a.--- बांकदार आकाराचा, बांकदार रेषांनी बनलेला.
Cusec क्यूसेक् n.--- ‘cubic feet per second’ चे संक्षिप्त रूप : वाहणाऱ्या द्रवाचा दर सेकंदास पुढे सरकणारा घनफटातील आकार.
Cuss कस् n.--- शाप, शिवी, दोष, अपराध, कमीपणा. शापित/तिरस्कृत/करंटा (मनुष्य/इसम/आसामी). दुष्ट/दुष्प्रवृत्त माणूस.