he ही pron.--- तो, जो कोणी माणूस.
head हेड् n.--- डोके, मस्तक, शेंडा, टोक, प्रमुख, नाईक, शिरोमणी, बुद्धी. v.t. and v.i.--- पुढाकार करणे, पुढारी असणे. ‘by head and shoulders’: बर्याच मोठ्या प्रमाणात, अत्यधिक. ‘head back / head off’: एखाद्याच्या पुढे जाऊन आटोक्यात आणणे, आवर घालणे, अडविणे, मागे रेटणे, रोखणे. ‘head over years’: पूर्णपणे/खोल बुडलेला / गाडला गेलेला / रुतलेला. ‘to make head or tail of’: -चा अर्थ समजणे.
headache हेडेक् n.--- कापाळदुखी.
heading हेडिंग् n.--- सदर, मथळा, शीर्षक.
headland हेड्लँड् n.--- टोक, भूशिर.
headline हेड्लाइन् n.--- वर्तमानपत्रातील ठळक अक्षरांत छापलेला मथळा / शीर्षक. विस्तृत निवेदनाचे अल्पाक्षर सार. वर्तमानपत्रांतील ठळकअक्षरातील सारांशवजा ओळ. शीर्ष(क) पंक्ति. (अ.व.) मुख्य वार्ता, वृत्तसारांश. (हिंदी: सुर्खी)
headlong हेड्लाँग् a. / ad.--- डोके पुढे/प्रथम राहिलेला/ठेवून अविचारपणाचा/अविचारपूर्वक अविलंब/ताबडतोब/एकाएकी केलेला.
headmaster हेड्मास्टर् n.--- शाळेचा मुख्य शिक्षक.
headstone हेड्स्टोन् n.--- कमानीचा मधला दगड.
headstrong हेड्स्ट्राँग् a.--- हट्टी, न ऐकणारा, दुराग्रही.
heady हेडि a.--- अविचारी, अविवेकी, हट्टी, झिंगविणारा, उत्तेजक, मादक, साहसी, अनावर, दुर्दम, बेछूट, मदोद्धत.
heal हील् v.t.--- बारा / निरोगी करणे, समेट करणे, ठीक होणे.
health हेल्थ् n.--- आरोग्य, प्रकृति, शरीरसंपत्ति.
healthy हेल्थी a.--- निरोगी, शरीरसम्पन्न, खुशाल, आरोग्यकारक.
heap हीप् v.t.--- -चा/-ची ढीग / रास करणे.
hear हिअर् v.t.--- ऐकणे, श्रवण करणे.
hearken
hearsay
hearse
heart
heart-break
heartache
heartburning
hearten हार्ट्न् v.t.--- -ला उत्साह / उल्हास / स्फूर्ती / आनंद देणे, -ला आनंदित / उल्हासित / उत्साहित करणे, -ला आनंदविणे.
hearth
heartily हा(र्)टिली ad.--- -’Hearty’ - पणाने / -पद्धतीने, मनःपूर्वक उत्साहाने, उल्हासाने. भरपूर, भरभरून, खूप, आवडीने.
heartiness हा(र्)टिनेस् n.--- ‘Hearty’ -पणा.
heartless
hearty हा(र्)टी a.--- स्नेहपूर्ण, भावपूर्ण. मनःपूर्वक, मनापासूनचा. सदिच्छायुक्त. जोरदार. जोमदार. धडधाकट, स्वास्थ्यपूर्ण. (अन्न, आहार, इ.) पोषक, बलवर्धक, पोटभर, तृप्तिदायक.
heat
heathen n.--- ‘बायबल’ मधील देवास / ख्रिस्ती धर्मास न मानणारा.
heave
heave-ho
heaven
heaven-kissing
heavy
hebrew हीब्रू n.--- Jew (ज्यू). ज्यू जमातीची मूळची भाषा.
heck हेक् n.--- नरक (hell). ‘अगदी’, ‘मुळीच’, अजिबात अशा अर्थी धाकांत ठेवणे. Eg. Heck no - मुळीच नाही.
heckle हेकल् v.t.--- -ला पिडणे / छळणे / सतावणे / भंडावणे, टोकणे, (निंदा, आरोप, आक्षेप, टोमणे, इ. द्वारा) घोळसणे.
hectare हेक्टेआर् / हेक्टेअर् n.--- दहा हजार चौरस मित्र क्षेत्राचे एकक / माप (संक्षिप्त रूप : ‘Ha’).
hectic हेक्टिक् a.--- एका विशिष्ट ज्वराच्या स्वरूपाचा / संबंधीचा. घाईगडबडीचा, तारांबळीचा, घाईगर्दीचा, क्षोभजनक.
hector हेक्टर् v.t.--- धाकांत ठेवणे, -वर वर्चस्व गाजविणे, -ला दडपणात ठेवणे.
hedge n.--- ‘आर्थिक इ. सुरक्षिततेचे साधन / उपाय’ या अर्थाचे उपपद. v.i.--- उडवाउडवी करणे / टाळाटाळ करणे. v.t.--- सापेक्ष करणे, सशक्त करणे, अती घालून सुरक्षित करणे. Hedge fund: कमीतकमी जोखीम व जास्तीत जास्त परतावा साधण्याच्या प्रधान उद्देशाने स्थापिलेला गुंतवणूक निधि.
hedgehog हेजहॉग् n.--- साळू.
hedgy हेज्जी a.--- टाळाटाळ / उडवाउडवी / चुकवाचुकवी करणारा. अंगचोर.
hedonism हीडोनिझम् n.--- ऐहिक सुखास किंव्हा श्रेष्ठ मानणारे नीतिशास्त्र, चंगळवाद.
hedonist हीडोनिस्ट् n.--- Hedonism चा अनुयायी; चार्वाकपंथी; चंगळवादी.
hedonistic हीडोनिस्टिक् n.--- Hedonism संबंधी / च्या स्वरूपाचा.
heed हीड् n.--- लक्ष, काळजी. v.t./v.i.--- लक्ष देणे, मनावर घेणे, लक्षपूर्वक अवधान देणे.
heedless हीड्लेस् a.--- निष्काळजीपणे केलेली, अविचारपूर्वक केलेली.
heel हील् To call (one) to (one’s) heel: उभे करणे; (उत्तर देण्यास वगैरे) उभे राहण्यास सांगणे.
hegemon हेजिमान् n.--- विशिष्ट सत्ताधीश समुदायात सर्वांवर वर्चस्व / वरचष्मा / प्रभुत्व गाजविणारा नेता. सर्वांत प्रभावशाली सत्ताधीश.
hegemony हिजेमनी / हेजिमनी n.--- पुढारीपण, (समूहांत एकाचा) अधिक योग्यतेचा / शक्तीचा प्रभाव / वर्चस्व / वरचष्मा. अधिपत्य, प्रभुत्व, ईश्वरभाव.
heifer हेफ(र्) n.--- तरुण गाय (कालवड) H. calf: गायीचे मादी वासरू.
height
heighten
heinous
heir
heirship
helical हीलिकल् / हेलिकल् a.--- -’helix’ चा / स्वरूपाचा. (pl. Helices).
helices n.--- पहा: ‘Helix’
helicopter हेलिकॉप्ट(र्) n.--- काटकोनांनी वर उड्डाण करू शकणारे व तसेच खाली उतरू शकणारे एक प्रकारचे विमान (पहा: chopper).
helium हीलियम् n.--- एक मूलतत्वात्मक (सूत्र He) वायु (वातावरणात अत्यल्पांशाने आढळणारा).
helix हेलिक्स् गुंडाळी, गुंडा, वळे, वलयात्मक वस्तु, वक्राकार वस्तु, वळसे घेत जाणारी (लांबोडी) वस्तु . पहा: ‘Coil’, ‘Spiral’.
hell
hellenic / Hellenistic हेलेनिक् / हेलिनिस्टिक् a.--- ग्रीस देश-/ग्रीक -समाज/-इतिहास/-भाषा /-संस्कृति -चा/-विषयक.
helmet हेल्मेट् n.--- युद्धांतील टोपी, शिरस्त्राण.
helmsman हेल्म्ज्मन् n.--- सुकाणूचालक. नेता. पुढारी.
help हेल्प् v.t.--- मदत करणे, सहाय्य करणे, इलाज करणे. v.--- ‘वाचवा’, ‘धावा’ (असा आक्रोश). n.--- मदतनीस, सहायक, नोकर. मदत, सहाय्य, इलाज, कुमक, उपाय. Help (one) with: (अंगात घालण्यास, उचलण्यास, नेण्यास इ.) साहाय्य करणे. H. (one): Can/Cannot h.: टाळू/थांबवू/बदलू शकणे/न शकणे. Help (one) (to): -ला वाढणे / खाऊ घालणे.
helping हेल्पिंग् n.--- (जेवणांत) एका वेळेला वाढलेले अन्न/केलेले वाढप.
helpless हेल्प्लेस् a.--- दुर्बळ, लाचार, दुबळा.