z-zeb

z झेड् / झी n.--- इंग्रजी वर्णमालेतले शेवटचे (सव्वीसावे) अक्षर / व्यंजन.
zabuton झॅबूटॉन् / झॅब्यूटॉन् n.--- जपान मध्ये प्रार्थनेसाठी जमिनीवर बसायला वापरली जाणारी चौकोनी किंवा आयताकार चपटी उशी.
zaddik त्साडीक् n.--- (यहूदी धर्मात) संतत्वाला पोचलेली व्यक्ति. (pl. Zaddikim त्साडीकीम्).
zaitech झाइटेक् n.--- स्वतःच्या धंद्यात अधिक नफा दाखविण्यासाठी, पैसे कमी व्याजात उसने घेऊन ते दुसरीकडे अधिक व्याजाने गुंतवून, त्यातून झालेला नफाही स्वतःच्याच धंद्याचा नफा म्हणून दाखविण्याची पद्धत. (जपान मध्ये १९७०-१९९० ह्या काळात जास्त प्रचलित).
zamindar झमीन्दार् n.--- ( भारतात ब्रिटिशांच्या काळांत) जमीनदार, शेतजमिनीचा मालक. (भारतात मोगलांच्या काळांत) कर वसूल करणारा. = Zemindar.
zamindary झमीन्दारी n.--- जमीनदाराकडे शेतजमिनीची मालकी असण्याची व त्याने कर वसूल करण्याची (मोगलांच्या व ब्रिटिशांच्या काळची) पद्धत. जमीनदाराचे कार्यालय, जमीनदाराचा प्रांत. = Zamindari / zemindari.
zany झेइनी a.--- वेडपट, खुळा, अर्धवट डोक्याचा, मूर्ख. n.--- विदूषक, विनोदी / खुळचट व्यक्ती.
zap झॅप् v.t.--- वेगाने आक्रमण / हल्ला / नष्ट करणे, जोरदार धक्का देणे. (पुस्तकांतील पाने / टी. व्ही. वरील कार्यक्रम इत्यादि) भरभर पुढे ढकलणे. Zap up --- उत्साहात्मक बदल करणे. v.i.--- जोरात / वेगाने हालणे. n.--- जोर, शक्ति, उत्साह, अकस्मात व जोरदार धक्का / फटका / हल्ला.
zax झॅक्स् n.--- छपरासाठी वापरला जाणारा दगड (slate) कापण्यासाठी किंवा त्यात खिळे मारायला भोके पाडण्यासाठी वापरले जाणारे कुऱ्हाडीसारखे हत्यार.
zeal झील् n.--- आवेश, कळकळ, उत्सुकता, उत्साह, आस्था, उमेद.
zealot झेलट् n.--- अति उत्साही, दुराग्रही, कडवट, धर्मांध, धर्मवेडा.
zealotry झेलट्री n.--- अति उत्साह, दुराग्रह, धर्मवेडेपणा, अनुचित आवेश, बेसुमार उत्साह.
zealous झेलस् a.--- आवेशी, उत्साहपूर्ण, उत्कंठित, कळकळ बाळगणारा, उत्साही, तळमळीचा.
zebra झीब्र n.--- घोड्यासारखा दिसणारा, पांढरट अंगावर काळे किंवा तपकिरी रंगाचे पट्टे असलेला, आफ्रिकेत आढळणारा सस्तन प्राणी.
zebra crossing झीब्रा क्रॉसिंग् n.--- पायी चालणाऱ्यांना वाहतुकीचा/रहदारीचा रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यावरती आखलेल्या पांढऱ्या पट्ट्या. ह्यांवर वाहनांपेक्षा पादचाऱ्यांना प्राधान्य असते.
zebu झीब्यू / झीबू n.--- बैलाच्या जातीचा एक पाळीव प्राणी.