ant अॅन्ट् n.--- मुंगी, पिपीलिका, वाळवी.
antacid अॅंटॅसिड् a.--- अम्ल(acid) निरोधक.
antagonist अॅन्टॅगाॅनिस्ट् n.--- प्रतिपक्षी, विरोधी.
antarctic अॅन्टार्क्टिक् a.--- दक्षिण ध्रुवाकडचा/कडील.
antarctic circle अॅन्टार्क्टिक् सर्कल n.--- दक्षिण ध्रुववृत्त.
antecedence अॅन्टिसीडन्स् n.--- पूर्वसिद्धि, पूर्वसत्ता.
antecedent अॅन्टिसीडन्ट् n.--- पूर्वीची गोष्ट, पहिला विषय, अग्रपद, पूर्वचरित्र. a.--- पूर्वीचा, मागला, अगोदरचा. (ad.) ly --- अगोदर, पूर्वी.
antedate अॅन्टिडेट् v.t.--- मागील तारीख घालणे, आगाऊ घालणे. n.--- मागील तारीख.
antediluvian अॅन्टिडिल्यूव्हियन् n.--- जलप्रलयापूर्वीचा, अतिप्राचीन, जुनाट.
antelope अॅन्टिलोप् / अॅन्टलोप् n.--- हरीण, मृग, हरण, मृगचर्म, मृगाजिन.
antemetic अॅन्टिमेटिक् n.--- उलटी बंद करणारे औषध.
antemundane अॅन्टिमन्डेन् a.--- सृष्टी होण्यापूर्वीचा.
antenna अॅन्टीना n.--- किड्याची मिशी.
antepenult अॅनटिपिनल्ट् n.--- उपान्त्य वर्णापूर्वीचा वर्ण.
anterior अॅन्टिरिअर् a.--- पूर्वीचा, अगोदरचा, पूर्ववर्ती.
anthem अॅन्थेम् n.--- स्तोत्र. n.--- स्तोत्रबद्ध करणे.
anther अॅन्थर् n.--- परागकोश, केशराग्र.
ant-hill अॅंन्ट्हिल् n.--- मुंग्यांचे वारूळ, भोम.
anthology अॅन्थाॅलाॅजि n.--- गद्यपद्य कुसुममाला, सूक्तिसंग्रह, साहित्यरचनांचा संग्रह.
anthropophagusअॅन्थ्रोपाॅफेगस् (usually in plural : Anthropophagi) n.--- नरभक्षक.
anthropic(al) अॅन्थ्रोपिक्(कल्) a.--- मानवी, मानवविषयक, मानवविशिष्ट.
anthropo- अॅन्थ्रोपो- ‘मानवी’, ‘मनुष्यजातिविषयक’ इत्यादि अर्थांचे शब्दारंभी येणारे पद.
anthropological अॅन्थ्रोपोलाॅजिकल् a.--- ‘Anthropology’ संबंधीचा.
anthropologist अॅन्थ्रोपोलाॅजिस्ट् n.--- ‘Anthopology’ चा अभ्यासक/तज्ज्ञ.
anthropology अॅन्थ्रोपोलाॅजि n.--- मानवशास्त्र, मानवी शरीर/मन/स्वभाव इत्यादिची पाहणी करणारे शास्त्र.
antibiotic अॅंटिबायाॅटिक् n.--- (सूक्ष्म जीवद्वारा उत्पादित) (रोग्याच्या शरीरातील) जंतूंना निर्बल/नष्ट करणारे (औषधि-) द्रव्य. प्रतिजैवक.
antibody अॅन्टिबाॅडी n.--- ‘प्रतीद्रव्य’. प्राण्यांच्या शरीरात शिरलेल्या घातक जंतूंना/विषाणूंना नष्ट/निर्बल करून टाकणारे, प्रतीजनां(antigen) च्या प्रेरणेने (प्लाझ्मा सेल्स द्वारा) बनलेले द्रव्य.
antic अॅन्टिक् n.--- विदूषक, मस्कऱ्या, माकडचेष्टा करणारा, माकडचेष्टा, विदुषकी चेष्टा. a.--- माकडचेष्टेचा.
anti-christ अॅन्टिक्राइस्ट् n.---ख्रिस्ती धर्माविरुद्ध.
anticipate अॅन्टिसिपेट् v.t.--- अटकळीत येणे, आघाडी साधणे, आधीच तरतूद करणे.
anticipation अॅन्टिसिपेशन् n.--- अटकळ, अपेक्षा, आघाडी, होरा.
anticipatory अॅन्टिसिपेटरि a.--- पूर्व-तयारी-/योजने-/विचारा- च्या स्वरूपाचा.
antidote अॅन्टिडोट् n.--- विषाचा उतारा, विषघ्न औषध.
antigen अॅन्टिजेन् n.--- ‘प्रतिजन’, प्राण्यांच्या शरीरात शिरलेल्या परोपजीवी जन्तूमधून निघणारे, प्रतिद्रव्य(antibody) घडवून आणणारे द्रव्य.
antilithic अॅन्टिलिथिक् n.--- मूतखडा होऊ न देणारे औषध.
antimony अॅन्टिमनि n.--- सुरम्याचा धातू (Abbreviation: Sb - from Stibium), सुरमा.
antinomy अॅन्टिनाॅमी n.--- विरुद्ध (पण आपल्यापरीने उचित) तत्व/सिद्धांत/निष्कर्ष.
antipathy अॅन्टिपथि n.---स्वाभाविक वैर, हाडवैर.
antiphrasis अॅन्टिफ्रेसिझ् n.--- विपरीत लक्षण.
antipodes अॅन्टिपोडिज् n.--- भूगोलावर ज्याठिकाणी आपण असतो त्याच्या समोर खालच्या बाजूस राहणारे लोक.
antipyretic अॅन्टिपायरेटिक् a. & n.--- तापावर औषध,ज्वरनाशक .
antiquarian अॅन्टिक्वेअरिअन् n.--- =Antiquary. a.--- प्राचीन वस्तूंसंबंधीचा/ त्यांच्या अभ्यासा-/अभ्यासकां- संबंधीचा.
antiquary अॅन्टिक्वेरी n.--- प्राचीन वस्तूंचा शोध करणारा/संग्रह करणारा.
antiquated अॅन्टिक्वेटेड् a.--- जुना, अप्रचलित.
antique अॅन्टिक् a.--- माजी, प्राचीन काळचा, पुराणकालीन, जुनापुराणा.
antiquity अॅन्टिक्विटी n.--- प्राचीनकाळची माणसे, वाडवडील, जुनी वस्तू, जुनेपणा, प्राचीन काळ.
antiseptic अॅन्टिसेप्टिक् a & n.--- सडू न देणारे.
antithesis अॅण्टिथिसिस् n.--- विरोध, अर्थवैपरीत्य, प्रतियोगी, पूर्णपणे विरुद्ध असलेली वस्तू किंवा व्यक्ती, अगदी उलट, दुसरे टोक.
antithetical अॅन्टिथेटिकल् a.--- विरोधवाचक, विरोधदर्शी.
antler अॅन्ट्लर् n.--- भारशिंग, शिंगशाखा, (हरिणाच्या) शिंगाचा फाटा.
antlion अॅन्टलायन् n.--- मोर, एडका.
anus एनस् n.--- गुदद्वार, अपानद्वार.
anvil अॅन्व्हिल् n.--- ऐरण.
anxiety अॅङ्झाइटि n.--- काळजी, घोर, अस्वस्थता.
anxious अॅङ्शस् a.--- चिंतातूर, अस्वस्थ.
any एनि a.--- कोणीही, कांही, कोणताही.
anyhow एनिहाउ ad.--- कसेतरी, कसेही.
anyone एनिवन् pro.--- कोणताही.
anything एनिथिंग n.--- कांहींही.
anywhere एनिव्हेअर ad.--- कोठेही.
anywise एनिवाइज् ad.--- कसेंही.
aorist एओरिस्ट n.--- सामान्य भूतकाळ, अनियमितकाळ.
aorta एआॅर्टा n.--- रक्तशयाची मुख्य धमनी.
apace अॅपेस् ad.--- जलदीने, घाईने, लवकर, झपाट्याने, जलदगतीने.
apache अपाश् n.---
apart अॅपार्ट ad.--- दूर, एकीकडे, अलग, वेगळा.
apartheid अपार् -थेट्/ -टेट्/ -टाइट्/ -टाइड् n.--- (दक्षिण अफ्रिकेत प्रचालित) वंश-/वर्ण-भेद (सर्व सामाजिक जीवनांत विभक्तीकरण).
apartment अॅपार्टमेंट n.--- खोली, कोठडी, दालन.
apathetic अॅपॅथेटिक् a.--- मंद, बेपर्वाईचा, उदासीन.
apathy अॅपथी n.--- मनोविकाराचा अभाव, जडता, औदासीन्य.
ape एप् n.--- माकड, वानर. v.t.--- नक्कल करणे.
aperient अॅपेरिअन्ट n.--- सौम्य-सुखाचे ढाळक.
aperitif अपरिटीफ् n.--- (पोटांतील) अग्नि प्रदीप्त करण्यासाठी भोजनापूर्वी घेतलेले मद्य (पहा : Digestif)
aperture अॅपर्चर् n.--- भोंक, छिद्र, रंध्र, विवर.
apex एपेक्स् n.--- कळस, शिखर, आग्रा, मस्तक, टोक. (plural : Apexes / Apices)
aphasia अफेझिया n.--- शब्दोच्चार लोप / शब्द लोप / वाग्लोप होण्याची विकृति.
aphorism अॅफाॅरिझम् n.--- सूत्र, वाक्य, वचन, नियम, म्हण, न्याय.
aphorist अॅफाॅरिस्ट् n.--- सूत्रकार, सूत्रबद्ध वचनांचा रचयिता.
aphoristic अॅफाॅरिस्टिक् ad.--- ‘Aphorism’ च्या स्वरूपाचा/-विषयक.
aphrodisiac अॅफ्रडिझिअॅक् n.---/ad.---कामोत्तेजक / कामोद्दीपक (द्रव्य / औषध)
apiary एपिअरि n.--- मधमाश्या राखून ठेवण्याचे स्थळ.
apiculture एपिकल्चर् n.--- मधुमक्षिका पाल.
apiece अॅपीस् ad.--- एकेकास, एकेकाच्या वांट्यास.
apish एपिश् ad.--- नकल्या, मर्कट स्वभावाचा.