Ischaemia इस्कीमिया n.--- रक्तहीनता, रुधिराभाव.
Ischium इस्कियम् n.--- माणूस इ. प्राण्याचा बसण्याचा आधार असलेला कटिप्रदेशाखालचा अस्थिरचनाभाग.
Island आयलन्ड् n.--- बेट, द्वीप. A.--- बेटांचा.
Isolate आयसोलेट् v.t.--- वेगळा करून ठेवणे, अलग/निराळा करणे.
Isonomia
Isosceles आयसोसिलिज् a.--- समद्विभुज (त्रिकोण).
Isotope आयसोटोप् / आयसटोप् n.--- एकाच मूलद्रव्याचा असा अणु जो त्या मूलद्रव्याच्या अन्य अणूंशी रासायनिक दृष्ट्या समान असून अणुभाराने भिन्न आहे. एकाच मूलद्रव्याचा असा अणु ज्यांतील प्रोटॉन्सची संख्या अन्य अणूतील प्रोटॉन्सच्या संख्येइतकीच पण ज्यांतील न्यूट्रॉन्सची संख्या भिन्न आहे.
Issuance इश्यू (स्यू) अन्स् n.--- जारी करण्याची/होण्याची प्रक्रिया, बाहेर पडण्याची प्रक्रिया.
Issue इशू / इस्यू v.i.--- व्यवहारात आणणे,फर्मावणे, बाहेर येणे, परिणाम होणे, उपजणे, जारी होणे/करणे. n.--- निकाल, संतति, परिणाम, मुद्दा; संतान.
Isthmus इस्थमस् / इस्मस् n.--- संयोगभूमि.
It इट् pron.--- ते. Its --- त्याचा. Itself--- स्वतः.
Itch इच् n.--- खरूज, कंड, कंडू, खाज. V.i.--- खाज अनुभवणे. (Itch for) तीव्र इच्छा धरणे / अनुभवणे. v.t.--- खाज उत्पन्न करणे.
Item आय्टम् / आयटेम् n.--- कलम, प्रकरण, दागिना. वेगळा दाखविलेला / वेगळा दाखविण्याजोगा विषय / भेद / वस्तु / व्यक्ति / गोष्ट. मद (हिंदी / अरबी). अंशक, अंगक.
Iterate इटरेट् v.t.--- पुनरुच्चार करणे, पुनः प्रतिपादणे.
Iteration इटरेशन् n.--- पुनःकथन, वीप्सा, पौनःपुन्य.
Ivory आय्व्हरि n.--- हस्तिदंत, गजदंत. A.--- हस्तिदंति.
Ivy आय्व्ही n.--- एक विशशिष्ट हिरव्यागार पानांचा व काळी करवंदी धारण करणारा वेल.