gallon गॅलन् n.--- पांच शेरांचे एक इंग्रजी माप, द्रव मोजण्याचे माप : ब्रिटीश गॅलन् = ४.५ लिटर. यू. एस. गॅलन् = ३.८ लिटर.
galloon गलून् n.--- काठ, पट्टी, इ. सारखी कपड्याची सजावट-वस्तु.
gallop गॅलप् v.i.--- भरधाव चालणे, चौखूर उडणे/धावणे, चौपायी चालणे. n.--- दौड, चाल.
gallows गॅलोज् n.--- फाशी देण्याचा खांब.
gallup poll गॅलप् पोल् n.--- एखाद्या विषयावरील लोकमताचा आढावा (अमेरिकन प्राध्यापक जॉर्ज गॅलप् यांनी १९३६ इ. मध्ये केलेल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या निकालाच्या अंदाजावरून पडलेले नाव).
galvanis(z)e v.t.--- प्रेरणा देणे, चेतविणे, एखाद्या धातूवर दुसर्या धातूचा थर देणे.
gambit n.--- डाव, (हुलकावणीची) खेळी, कावा. लोखंडावर जस्ताचा लेप देणे.
gamble गॅम्बल् v.t.--- जुवा खेळणे, जुगार खेळणे. n.--- जुगार (विशे. लाक्षणिक अर्थाने).
gambler गॅम्बलर् n.--- जुगार खेळणारा.
gambling गॅम्बलिंग् n.--- जुगार.
gamboge गॅम्बोज् n.--- रेवाचिनीचा शिरा, रेम्बदसार.
gambol गॅम्बोल् n.--- नाचणे, उद्या मारणे, खिदळणे.
game गेम् n.--- खेळ, डाव, पैज, शिकार (लक्ष्यभूत जीव).
gamester गेम्स्टर् n.--- पैज लावून खेळणारा, जुगारी.
gamon गॅमन् n.--- फसवणूक, लुच्चेगिरी.
gamot गेमट् n.--- स्वरग्राम - सा, रे, ग, म, प, ध, नी. (एखाद्या विषयाचा) संपूर्ण व्याप , संपूर्ण पद्धति.
gander गॅण्डर् n.--- हंस-जातीच्या पक्ष्यातील नर (male goose).
gang गँग् n.--- टोळी, गट्टी, कैद्यांचा समुदाय.
ganglion गँग्लिआॅ(अ)न् n.--- सूज, गळू, फोड, अर्बुद. पुंज, ग्रन्थि, केंद्र (विषे: मज्जातंतूचे) नाडीचक्र.
gangway गँग्वे n.--- रस्ता, गलबतावर जाण्याचा दोर.
gangrene गँग्रीन् v.t.--- सडवणे, शरीरांतील मांस कुजवणे. n.--- सडणारी जखम.
gape गेप् v.i.--- तोंड वासणे, जांभई देणे.
gape, गेप् Gaping गेपिंग् n.--- जांभई.
garage गॅराज्, गॅरिज् n.--- मोटारीचा तबेला.
garb गार्ब् n.--- वेष, बाह्यरूप.
garbage गार्बेज् n.--- गदळ, गाळ, घाण, गाळसाळ, केरकचरा.
garble गार्बल् v.t.--- गाळून लिहिणे, गाळणे.
garden गार्डन् n.--- बाग, उपवन, उद्यान, वाटिका.
gardener गार्डनर् n.--- बागवान, माळी.
gardenplot गार्डन्प्लॉट् n.--- वाफा, ताटवा, तक्ता.
gargantuan गार्गॅण्ट्युअन् a.--- राक्षसी, प्रचंड, अवाढव्य.
gargle गार्गल् n.--- गुळणा, गुळण्याचे औषध, गुळणी. v.--- गुळण्या करणे.
gargarize गार्गराइझ् v.t.--- गुळण्या करणे.
gargoyle गार्गॉइल् n.--- छपरावरील पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी पन्हाळीच्या तोंडाशी बसविलेले विचित्र/विलक्षण असे दिसणारे माणसाचे किंवा एखाद्या प्राण्याचे कोरलेले तोंड.
garland गार्लन्ड् n.--- हार, गजरा, माला, माळ.
garlic गार्लिक् n.--- लसूण.
garment गार्मेन्ट् n.--- पांघरूण, वस्त्रप्रावरण.
garner गार्नर् n.--- कोठार, कोठी. v.t.--- कोठीत ठेवणे.
garnet गार्नेट् n.--- याकूत नावाचा मौल्यवान दगड, एक रत्न.
garnish गार्निश् v.t.--- शोभिवंत करणे, सजवणे, -ला स्वादिष्ट/रुचकर/चवदार बनविणे. n.--- अलंकार, शोभा देणारी वस्तु, भपकेदार पोषाख. स्वाद/रुचि/चव/रूप आणण्यासाठी घातलेले/लावलेले द्रव्य.
garniture गार्निचर् n.--- पोषाख, सामानसुमान.