smu-sno

smudge स्मज् v.t.--- घाणीने भरवणे, माखणे, डागाळणे, अस्पष्ट करणे.
smug स्मग् a.--- चकमक, लकपक, पोशाकांत थाटबाज, आत्मविश्वासदर्शक, ऐटबाज.
smugly स्मग्ली ad.--- ऐटीत, आव आणून.
smut स्मट् n.--- एक प्रकारचा बुरा / कीड; डाग, कलंक. काजळी, मस. हीन दर्जाचा (मातीमिश्रित) कोळसा. v.t.--- काजळी जमणे.
smutty स्मटी a.--- गलिच्छ, अभद्र, अवाच्य, अश्लील (भाषा, लिखाण इ.).
snack स्नॅक् n.--- अल्पोपहार, खाऊ.
snafu स्नफू (acronym from ‘Situation Normal All Fouled Up). n.--- गोंधळ, बट्टयाबोळ. a.--- गोंधळाचा.
snag स्नॅग n.--- उंचवटा, टेंगूळ; अडथळा, अडचण, तुटका भाग.
snail स्नेल् n.--- गोगलगाय. a.--- फार हळू चालणारा.
snake स्नेक् n.--- साप.
snake catcher स्नेक् कॅचर् n.--- गारुडी.
snap स्नॅप् v.t.--- चुटकी वाजविणे, कट्कन मोडणे. एकदम चावणे, एकदम पकडून खाणे, (वर) उसळणे, एकदम शब्द बोलणे, चिडून बोलणे. n.--- चुटकी, चांप, तुकडा, घांस. a.--- झटक्यात / अकस्मात केलेला. Snap up --- लाटणे, बळकावणे, पटकावणे.
snappish स्नॅपिश् a.--- चिडखोर, तुसडा, हिरवट.
snare स्नेअर् v.t.--- फांसांत अडकविणे. n.--- फांस, पाश.
snarl स्नार्ल् v.t.--- गुरगुरणे, गुंतवणे. n.--- गुरगुरणे, गांठ, फांस.
snatch स्नॅच् v.t.--- हिसकणे, दपटणे. n.--- हिसका, दपटादपटी. झडप, तुकडा.
snazzy स्नॅझी a.--- नखरेबाज, झकपक, चमकदार, चित्तवेधक.
sneak स्नीक् v.i.--- आर्जव / जी करणे, थुंकी झेलणे, चोरून नकळत जाणे.
sneaker स्नीकर्
sneaking स्नीकिंग् a.--- छुपा, गुप्त, सुप्त (वासना / जाणीव इ.).
sneer स्निअर् v.i.--- नाक मुरडणे, खोचून बोलणे. n.--- उपहास, तिरस्कारयुक्त मुद्रा.
sneeze स्नीझ् v.i.--- शिंकणे, शिंक येणे. n.--- शिंक.
snick स्निक् n.--- बॅटने चेंडूस दिलेला हलका फटका, असा फटका मारणे.
snicker स्निकर् v.i.--- हसू दाबणे. हलकेच / दबलेल्या / दाबलेल्या आवाजांत हसणे. अशा रीतीने उपहास व्यक्त करणे.
snide स्नाइड् a.--- बनावट, नकली, हलका, तुच्छतायुक्त, खोटा. तुच्छतेची / तिरस्काराची भावना बाळगणारा.
sniff स्निफ् v.i.--- नाकाने श्वास घेणे, सूं सूं करणे, Sniff at --- नाक ओढणे. n.--- सूं सूं.
sniffle स्निफल् v.i.--- पुनःपुनः नाक ओढणे, तिरस्कार / राग व्यक्त करणे.
snigger स्निगर् n./v.i.--- दबलेले / दाबलेले / लपविले हास्य (करणे). हसू दाबणे, हलकेच (गुपचुप) हसणे. = Snicker.
snip स्निप v.t.--- कातरणे, भुरटेचोरी करणे. n.--- कांट, छांट.
snipper स्नाइपर् n.--- छाटणारा / कापणारा; शिंपी; कापलेला तुकडा.
snippet स्निपेट् n.--- (लेख, भाषण इ. चा) अंश / नमुना / (लक्षणीय) भाग. तुटक / तुसडे वचन.
snippety स्निपेटि a.--- तुटक / तुसडे वचन बोलणारा.
snitch स्निच् v.t.--- क्षुल्लक / भुरटी चोरी (करणे), लबाडी करून पळविणे. n.--- मामुली बिघाड, भुरटी चोरी, लबाडी. v.i.--- खबऱ्या म्हणून काम करणे, चहाड्या करणे.
snivel स्निव्हेल् v.i.--- शेंबूड गळणे, नाक वाहणे. n.--- शेंबूड.
snob स्नॉब् a.--- आपणाहून उच्च मानलेल्यांची मर्जी सांभाळणारा व त्यांचे अनुकरण करणारा. आपणाहून कनिष्ठांना तुच्छतापूर्वक आश्रय देणारा, विद्वत्तेचा / अभिरुचीचा अहंगड असलेला, उच्चभ्रू. n.--- पैसा, प्रतिष्ठा, बुद्धिमत्ता इ. चा दिमाख दाखविणारा मनुष्य.दांभिक/ढोंगी (व्यक्ति).
snobbery स्नॉबरि n.--- संपत्ति, प्रतिष्ठा इ. चे स्तोम माजविण्याची मनोवृत्ति / वागणूक. दामभिकतेची वर्तणूक. सामाजिक दर्जा, विद्वात्ता, अभिरुचि इ. गोष्टीचा आव आणून गर्वाने / दंभाने वागण्याची रीत.
snobbish स्नॉबिश् a.--- दिमाख दाखविणारा, (स्वतःचे) स्तोम / देव्हारे माजविणारा, दांभिक, ढोंगी.
snooker स्नूकर् n.--- Billiards चा खेळ. पहा : Billiards.
snoop स्नूप् v.t.--- हडपणे, हस्तगत करणे, लाटणे, टेहळणी करीत हिंडणे.
snooze स्नूझ् v.i.--- डुलकी घेणे , झोपणे. n.--- डुलकी.
snore सनोर् / स्नॉ(र्) v.i.--- घोरणे. n.--- घोरण्याचा आवाज.
snort स्नॉर्ट् v.i.--- फुरफुरणे, खेसणे. (घोड्या -चे / -सारखे) नाकाने हवा ओढून फुरफुर आवाज काढणे. (चूर्ण इ.) नाकाने ओढून घेणे. Sonrt out --- नाकाने फुरफुरत बाहेर टाकणे. n.--- फुरफुरणे.
snot स्नॉट् n.--- शेम्बवूड. v.t.-- शिंकरणे.
snotty स्नॉटी a.--- शेंबड्या.
snout स्नाउट् n.--- जनावरांचे मुसकट, नळाचे तोंड, माणसाचे नाकाड. v.t.--- तोंड बसवणे.
snow स्नो n.--- बर्फ. v.i.--- बर्फ पडणे.
snowy स्नोई a.--- बर्फ़ासारखा, पांढरा, निर्मळ.हिमाच्छादित, हिमयुक्त, हिमशुभ्र.