str-stu

straddle स्ट्रॅडल् v.t.--- फेंगडे चालणे, ढेंग टाकून जाणे. दोन्ही बाजूला पाय सोडून (-वर) बसणे / राहणे.
straggle स्ट्रॅगल् v.i.--- मार्ग सोडणे, भटकणे, रेंगाळत मागे राहणे. n.--- मागे रेंगाळणाऱ्यांचा गट, इकडे तिकडे विखुरलेल्यांचा समूह.
straggler स्ट्रॅग्लर् n.--- भटक्या मारणारा, भटक्या, काम चुकवून भटकणारा.
straight स्ट्रेट् a.--- सरळ, नीट, बरोबर. ad.--- तेंव्हाच. n.--- सरळ भाग, सरळ रेषा.
straighten स्ट्रेटन् v.t.--- नीट / सरळ करणे.
straightforward स्ट्रेट्फॉर्वर्ड् ad.--- धोपट मार्गाचा, धोपट, सरळ.
straightness स्ट्रेट्नेस् a.--- नीटपणा, सरळपणा.
strain स्ट्रेन् n.--- ताण, तणाव, दबाव, कष्ट. v.t.--- ताणणे, गाळणे, पाझरणे, मिठी मारणे, कुंथणे, लचक भरणे. v.i.--- ओढून आणणे. n.--- लचक, ओढ, नेट, गाणे, पालुपद. वंश, प्रकार, वर्ग, जात.
strainer स्ट्रेनर् n.--- गाळणारा, ताणणारा.
strait / Straits स्ट्रेट् / स्ट्रेट्स् n.--- सामुद्रधुनी, अडचणीची अवस्था. कोंडी. कचाट, विपत्ति, दारिद्र्य. (हिंदी: जलडमरुमध्य). a.--- अरुंद, घट्ट, कडक.
straitened स्ट्रेटंड् a.--- अडचणीचा, ओढगस्त.
strand स्ट्रॅन्ड् v.t.--- काठावर चढणे, किनाऱ्यावर आपटणे.n.--- काठ, किनारा, पेंड, पदर, तट. धागा, बंध.
strange स्ट्रेन्ज् a.--- विलक्षण, विजातीय, परका.
stranger स्ट्रेन्जर् n.--- पाहुणा, परका, अनोळखी.
strangle स्ट्रँगल् v.t.--- गळा दाबून / गुदमरवून ठार मारणे, नायनाट करणे. गळा दाबणे, गुदमरविणे, चेंगरून टाकणे, चिरडून टाकणे. v.i.--- गुदमरणे, श्वासावरोध अनुभवणे. n.--- दाबणे वगैरे (strangle (v.)) ची प्रक्रिया.
strangle - hold स्ट्रँगल्-होल्ड् : गुदमरवून वगैरे (strangle (v.)) टाकणारी पकड.
strangulate स्ट्रँग्युलेट् v.t.--- दाबणे, आवळणे, चिमटविणे, फास(ट)णे.
strangulation स्ट्रँग्युलेशन् n.--- आवळण्याची / चिमटण्याची / दाबण्याची किंवा आवळले-/चिमटले-/दाबले-/फासले- जाण्याची प्रक्रिया / अवस्था.
strap स्ट्रॅप् n.--- कातड्याची वादी.
strapping स्ट्रॅपिंग् a.--- बळकट, धडधाकट, धट्टाकट्टा, भरभक्कम.
stratagem स्ट्रॅटेजजेम् n.--- उपाय, इलाज, करामत, कसब, युक्ति, कावा.
strategy स्ट्रॅटेजि n.--- लष्करी डावपेच, युक्ति, व्यूहरचना.
stratum स्ट्रेटम् n.--- थर, पडदा.
straw स्ट्रॉ n.--- काडी, कस्पट, केर. धान्य काढलेले गवत, कडबा. पेय पिण्याची कागद वगैरेची नळी. क्षुल्लक/तुच्छ/ उपेक्षणीय गोष्ट / वस्तु. अशा अर्थी विशेषणासारखा उपयोग. eg. The Maratha ‘straw’ man. Man of straw / Straw-man --- पोकळ / शुष्क / कुचकामी माणूस.
strawberry स्ट्रॉबेरी n.--- एका फळाचे नाव.
stray स्ट्रे v.i.--- भटकणे, रस्ता सोडणे. a.--- बहकलेला, चुकार, भटक्या. n.--- चुकार गुरू.
streak स्ट्रीक् n.--- अंगभूत छटा. v.i.--- रेघोट्या काढणे, चित्रविचित्र करणे. जोरात धावणे. n.--- रेघ, रेघोटी, रेषा, शीर, दोरा; चमक (विजेची) (दैवाची).
stream स्ट्रीम् n.--- ओढा, ओहोळ. v.t.--- पाट / ओघळ वाहणे. फडफडणे, फडकणे.
streamer स्ट्रीमर् n.--- बावटा, निशाण.
streamlet स्ट्रीम्लेट् n.--- ओहोळ, बाहळी.
streamline स्ट्रीम्लाइन् n.--- मोटरगाडी, विमान आदि वाहनांचा (वेग इत्यादींचा उच्चस्तर टिकविण्यासाठी दिलेला) बाह्याकार / बाह्यांगाची रूपरेखा. v.t.--- सोपेपणा, कार्यक्षमता इ. दृष्टींनी सुव्यवस्थित करणे / मांडणे.
street स्ट्रीट् n.--- रस्ता, मार्ग, पथ.
strength स्ट्रेन्थ् n.--- शक्ति, जोर, बळ, कस, धमक.
strengthen स्ट्रेन्थन् v.t.--- शक्ति वाढविणे, जोर आणणे, जोरावणे, धैर्य देणे, जीव आणणे.
strenuous स्ट्रेन्युअस् a.--- उद्योगी, उद्योगाचा, परिश्रमी.
stress स्ट्रेस् n.--- जोर, आग्रह, ताण, ओढ.
stretch स्ट्रेच् v.t.--- पसरणे, सैल होणे, तिखटमीठ लाऊन सांगणे. ताणणे, ताठ करणे, खेचून आणणे. n.--- ताण, प्रयत्न, दम, नेट, विस्तार.
stretcher स्ट्रेचर् n.--- पसरणारा, ताणणारा.
strew स्ट्र्यू v.t.--- विखरून टाकणे, फैलावणे, पसरणे. participle : strewn.
strict स्ट्रिक्ट् a.--- सुती, रेखलेले, कडकडीत, खरा, सक्त, कडक.
strictly स्ट्रिक्ट्लि ad.--- कडकडीतपणाने, सक्तपणाने.
stricture स्ट्रिक्चर् n.--- दोषाविष्करण, टीका, ताशेरा. शरीरगत वाहिनी / नलिकेचे संकुचन (अरुंद होण्याची/-चा प्रक्रिया/विकार). अडथळा, अडचण, निरोध.
stride स्ट्राइड् v.t.--- ढेंग टाकणे. n.--- ढेंग, टांग. पदक्षेप. To take …. In one’s stride : अडचण / प्रतिकूलता लीलया / सहजासहजी / जाताजाता पार करणे. To get into one’s stride : स्वतःच्या कामांत रुळणे / जम बसविणे / स्थिरावणे.
stridency स्ट्राय्डन्सी n.--- (बोलचालण्यांतील) कर्कशता, कठोरता, भांडखोरपणा आदि.
strident स्ट्राय्डन्ट् a.--- आवाजाने कर्कश / भांडखोर.
strife स्ट्राइफ् n.--- कज्जा, झटापट, स्पर्धा.
strike स्ट्राइक् v.i.--- प्रहार करणे, मारणे, शिरकविणे, चकित करणे, संप करणे, हरताळ पाडणे. (विशिष्ट विचार / भावना / भूमिका) व्यक्तविणे. v.t.--- (वाद्यांतून विशिष्ट) ध्वनि काढणे.Strike at --- हल्ला करणे. Strike for --- एकदम निघणे. Strike in --- एकदम आत येणे. Strike on --- झेप मारणे. Strike up --- बाजू लागणे.
string स्ट्रिंग् v.t.--- ताणणे, तयार लावणे. गुंफणे, लटकविणे. n.--- दोरी, सर, हार. अणु (atom) बनविणाऱ्या बारा विविध अणुकांचे कल्पित मूलभूत घटकद्रव्य. To have two (or many etc.) strings to one’s bow : दोन (वा अधिक) पर्यायी मार्ग / उपाय तयार ठेवणे. Second string to bow : पर्यायी उपाय, भूमिका पक्ष, वैकल्पिक साधन, पर्याय.
string-theory स्ट्रिंग् - थिअरी n.--- (मणिसूत्रसंकल्पना) अतिसूक्ष्मावकाशांत सामावलेली किमान दहा परिमाणे (dimensions) असलेली, ‘string’ संकल्पनेवर आधारित, विश्वाची कल्पना.
stringent स्ट्रिंजंट् a.--- कडक, अशिथिल, निर्भीड.
strip स्ट्रिंप् v.t.--- उसकटणे, सोलणे, नागवणे, वेष्टून काढणे. उघडे / मोकळे करणे. नग्न / विवस्त्र करणे. (धन, पद, अलंकरण इ. पासून) विहीन करणे. v.i.--- नग्न / विवस्त्र होणे, उघडे होणे. n.--- लांबट, अरुंद वस्तु / तुकडा. पट्टी, पट्टा. असा प्रदेश, जलाशय इ..
striptease स्ट्रिप्टीझ् / स्ट्रिप्टीझ् n.--- प्रेक्षकांसमोर हळूहळू विवस्त्र / नग्न होत जाण्याचा नृत्यप्रकार. v.i.--- ‘striptease’ करणे.
stripe स्ट्राइप् v.t.--- फटके मारणे. n.--- फटका, फटकारा.
stripling स्ट्रिप्लिंग् n.--- बाप्या, पोऱ्या.
strive स्ट्राइव्ह् v.i.--- उद्योग करणे, भांडणे, झुंजणे.
stroke स्ट्रोक् v.t.--- कुरवाळणे, चापचोपी करणे, थोपटणे. n.--- टोला, प्रहार, आघात, फटका, हात, सफाई. पराक्रम, गुणप्रदर्शन.
stroll स्ट्रोल् v.i.--- (पायी, रमतगमत /सावकाश) हिंडणे, फिरणे. n.--- (असा) फेरफटका.
strong स्ट्राँग् a.--- बळकट, जोरदार, मजबूत, उग्र, बलिष्ठ.
structure स्ट्रक्चर् n.--- बांधणी, घडणे, इमारत, बांधा.
struggle स्ट्रगल् v.i.--- तडफडणे, झोंबी करणे, कष्ट करणे, गटांगळ्या खाणे. n.--- तडफड, आदळआपट, झोंबाझोंबी, गटांगळी, आटापीट, प्रयास, लटपट.
strum स्ट्रम् v.t.--- (तंतुवाद्य) निष्काळजीपणे छेडणे / वाजविणे.
strumpet स्ट्रम्पेट् n.--- कसबीण. v.t.--- भ्रष्ट करणे.
strut स्ट्रट् v.i.--- चमकत चालणे, ताठयांत चालणे. n.--- नखरा, ठमका.
stub स्टब् n.--- सड, (तोडलेल्या झाडाचे जमीनींत राहिलेले) तुटके खोड, तुटका / खच्ची केलेला / सोडून गेलेला तुकडा. ह्रस्व खंडशेष.
stubble स्टबल् n.--- (सामूहिक) दाढीचे खुंट; (कापणीनंतर जमिनीवर राहिलेले पिकाचे) खुंट / सड. सडांनी व्याप्त शेत. (असामूहिक) खुंट, सड.
stubborn स्टबर्न् a.--- ताठ, कडक, दुराग्रही, हट्टी, नाठाळ.
stud स्टड् v.t.--- जाडीत करणे. n.--- पागा, आधार. (घोडा इ.) प्राण्यांतील प्रजोत्पादनार्थ पाळलेला / सोडलेला नर. अशा नार-प्राण्यांचा पाळीव कळप / पालनकेंद्र. (भिंत इ. मध्ये खोचून बसवलेला) खुंटा, खुंटी, कील, खिळा. (कपडा अंगात चांगला बसण्यासाठी लावलेला - कपड्याचे पदर जोडणारा कील(-बंध).
student स्टूडन्ट् n.--- विद्यार्थी, शिकणारा.
studied स्टडीड् a.--- शिक्षित, पढीक.
studio स्टूडिओ n.--- फोटो काढण्याची जागा.
studious स्टूडिअस् a.--- विद्याभ्यासी, विद्याव्यासंगी.
study स्टडि v.i.--- अभ्यास करणे, शिकणे, मनन करणे. n.--- अभ्यास, व्यासंग, विचार, चिंतन. Study in --- प्रयोग / नमुना / उदाहरण म्हणून केलेले काम.
stuff स्टफ् v.t.--- गच्च भरणे, मेलेल्या पशूंच्या कातड्यांत पेंढा भरणे. n.--- कापड, चीजवस्त.
stuffy स्टफी a.--- कोंदट, गुदमरवणारा.
stultification स्टल्टिफिकेशन् n.--- वेडाचार, नगण्य करणे.
stumble स्टम्बल् v.i.--- अडखळणे, ठेंच लागणे, घसरणे, अडखळत / कडमडत चालणे, अवचित मिळणे/भेटणे. n.--- ठेंच, स्खलन.
stumbling block स्टम्बलिंग् ब्लॉक् n.--- अडचण.
stump स्टम्प् v.t.--- बुचकळ्यांत टाकणे. तोडणे, छाटणे. n.--- क्रिकेट-खेळपट्टीवरील सहा दांड्यांपैकी कोणतीही एक, ‘wicket’ मधील (एक) दांडी, यष्टि. खुंटा, बोटूक, थोटूक सड.
stumpy स्टम्पी a.--- गिड्डा, लांडा, ठेंगू.
stun स्टन् v.t.--- कानठळ्या बसविणे, ठोक्याने मूर्च्छा आणणे, चकित करणे. n.--- बधिरता.
stunt स्टंट् n.--- (प्रसिद्धि इ. साठी केलेला) उपद्व्याप / ‘पराक्रम’, ‘लीला’. खुरटपणा. v.t.--- वाढ खुंटवणे, मोडणे.
stupefaction स्टुपिफॅक्शन् n.--- गुंगी, मोह, धुंदी.
stupefy स्टुपिफाय् v.t.--- मंद करणे, गुंगी / भोवळ आणणे, आश्चर्यचकित / थक्क करणे.
stupendous स्टुपेन्डस् a.--- आश्चर्यकारक, अचाट, भव्य.
stupid स्टुपिड् a.--- मूर्ख, मंद, धुंद, मूढ.
stupidity स्टुपिडिटि n.--- मूर्खपणा, मंदपणा, धुंदपणा.
stupor स्टुपर् n.--- धुंदी, भूल, गुंगी, मोह, बेशुद्धि.
sturdy स्टर्डि a.--- दुराग्रही, हट्टी, राकट, काटक, भक्कम, जोमदार.
stutter स्टटर् v.t.--- तोतरे बोलणे. थरथरता ध्वनि काढणे.