surcharge सरचार्ज् v.--- -वर अधिक भार टाकणे, अधिक / वाढीव मूल्य/कर लावणे / लादणे. अधिक ओझ्याने / भावनावेगाने प्रभावित / भारित करणे, भारणे. n.--- आधि(क)भार, करावर लादलेला वाढीव कर.
surd सSर्ड् n./a.--- = ‘Irrational number’, विशेषतः ‘घातमूल’-रूपातील. (ध्वनि, उच्चार, आवाज, इ.) घट्ट, आवळलेला, ‘कठोर’ (व्यंजन). आडमुठा, खुळा.
sure शुअर् a.--- खचित, निःसंशय, अचूक, निर्भय.
surefire शुअ(र्)फाय(र्) a.--- खात्रीचा, खात्रीने यशस्वी होण्याजोगा.
surely शुअर्लि ad.--- खचितपणा, खातरी, जामीन, हमी.
surf सSर्फ् n.--- लाटांचा खळबळाट. समुद्राच्या भरतीची तीरावरील धडक / आक्रमण. अशा धडकांमुळे सागरतीरावर ओसंडणाऱ्या फेसाळ लाटा / लाटांच्या ओळी. समुद्राच्या भरतीच्या लाटांची किनाऱ्यावर आदळून फेसाळण्याची प्रक्रिया. v.--- लाटांवर आंदोलणे. v.i.--- आगगाडीच्या छपरावर बसून वा बाजूला लोंबकळत प्रवास करणे. v.t.--- (माहितीच्या महाजाळा)-चा धांडोळा घेणे. पहा: ‘browse’.
surface सर्फेस् n.--- पृष्ठभाग, वरचा भाग, बाह्यरूप. a.--- बाह्यपृष्ठभागाचा. v.t.--- पृष्ठभाग गुळगुळीत करणे.
surge सर्ज् n.--- मोठी भयंकर लाट.
surfeit सर्फीट् v.t.--- यथास्थित खाण्यास घालणे. v.i.--- ताव मारणे. n.--- रेलचेल, फाजील खाणे, वीट. जादा प्रमाण किंवा पुष्कळ प्रमाण.
surgeon सर्जन् n.--- शास्त्रवैद्य, शल्यकर्ता, शल्यकार.
surgery सर्जरी n.--- शास्त्रवैद्यकी, शल्यक्रिया (शास्त्र).
surly सर्लि a.--- खट्याळ, खाष्ट, द्राष्ट, तुसडा, कुरठा.
surmise सर्माइस् v.t.--- तर्क करणे. n.--- तर्क, कल्पना.
surmount सर्माउन्ट् v.t.--- निभावणे, श्रेष्ठ करणे.
surname सSर्नेम् n.--- आडनाव, उपनाव. कुटुंबाचे / कुळाचे (त्यांतील सर्वांना लागू असलेले नाव. कुलनाम, आडनाव. v.t.--- उपनाव ठेवणे.
surpass सर्पास् v.t.--- वरचढ करणे, मागे टाकणे.
surplice सSर्प्लिस् n.--- ख्रिस्ती धर्मगुरूंचा सैल, गुढग्यापर्यंत पोचणारा, पांढरा झगा.
surplus सर्प्लस् a.--- फाजील, उरलेला. n.--- उरवण.
surplusage सर्प्लसेज् n.--- वरताळा, उपराळा.
surprise सर्प्राइझ् v.t.--- चकित करणे, अवचित.
surprising सर्प्राइझिंग् a.--- विलक्षण, आश्चर्यकारक.
surreal सरियल् a.--- असंबद्ध, विसंगत, विचित्र, विकल्पनात्मक (वैकल्पिक), वस्तुस्थितीस सोडून असलेला. चमत्कारिक. स्वप्नाळू.
surrealism सरियलिझम् n.--- केवळ मनात उद्भवणाऱ्या / स्वप्नात प्रतीत होणाऱ्या, सामान्य वस्तुस्थितिदृष्टीने असंबद्ध. विसंगत, विचित्र, वेडसर अशा कल्पना / विकल्प यांवर आधारित कला-/साहित्य- -निर्मिति पुरस्कारणारा पंथ / संप्रदाय. (हिंदी: अतियथार्थवाद).
surrealist सरियलिस्ट् n.--- ‘Surrealism’ चा अनुयायी / पुरकर्ता.
surrealistic सरियलिस्टिक् a.--- ‘Surrealism’ -संबंधीचा.
surrender सरेंडर् v.i.--- शत्रूस शरण जाणे, स्वाधीन होणे.
surreptitious सरेप्टिशस् a.--- चोरून / गुपचूप केलेली (कृति). अनधिकृतपणे प्राप्त केलेले.
surrogacy सरोगसी n.--- ‘surrogate’-पणा.
surrogate सरगेट् n.--- बदली व्यक्ति / वस्तु. (कुणा-/कशा- ऐवजी) तात्पुरती योजलेली / वापरलेली वस्तु / व्यक्ति. a.--- उसना, उधार, भाडोत्री, बदली, प्रतिनिधिभूत, पर्यायभूत. (हिंदी: स्थानापन्न).
surrogate mother सरगेट् मदर् n.--- १. अन्य स्त्रीच्या वतीने तिचा गर्भ (तिने आपल्या गर्भाशयांत धारण केलेला किंवा तिच्या पतीच्या / पुरुष-जोडीदाराच्या पुरुषबीजमात्र असलेला) स्वतःच्या गर्भात वाढवून त्यास जन्म देण्यापुरतेच केवळ आईचे काम करणारी स्त्री. २. आईची भूमिका वठवणारी व्यक्ति.
surrogateship सरगेट्शिप् = Surrogacy.
surround सराउन्ड् v.t.--- घेरा घालणे, वेढणे.
surrounding सराउन्डिंग् a.--- भोवतालचे. n.--- भोवतालचा प्रदेश.
surveillance सSर्व्हेलन्स् n.--- कडक / सूक्ष्म लक्ष / नजर.
survey सर्व्हे v.t.--- पाहणे, मोजणी करणे. n.--- पाहणी, मोजणी.
survive सर्व्हाइव्ह् v.t.-- मागे राहणे.
susceptibility ससेप्टबिलिटी n.--- संवेदनाक्षमता. भावनांची कोमलता / नाजुकता. भावनांची वशता. प्रभावित होण्याची प्रवणता.
susceptible ससेप्टिबल् a.--- वश, नाजूक. संस्कारक्षम, संवेदनशील.
suspect सस्पेक्ट् v.i.--- वाशीम असणे / येणे, कल्पना करणे. n.--- वाहिमी माणूस.
suspend सस्पेन्ड् v.t.--- टांगणें, टांगून ठेवणे, कमी करणे, तहकूब ठेवणे.
suspended सस्पेन्डेड् a.--- निलंबित, तात्पुरता पदच्युत / बडतर्फ.
suspense सस्पेन्स् n.--- मोघमपणा, दुग्धा, अनिश्चय.
suspension सस्पेन्शन् n.--- तहकुबी, बंदी. निलंबन, तात्पुरती पदच्युति.
suspicion सस्पिशन् n.--- संशय, वहीम, कल्पना.
suspicious सस्पिशस् a.--- संशयाचा, संशयी, संशयास्पद, भ्रमाचा, संशयावर आधारित, संशयाधिष्ठित.
sustain सस्टेन् v.t.--- सोसणे, पोसणे, मंजूर करणे, धरणे, धारण करणे.
sustenance सस्टनन्स् n.--- उपजीविका, पोटगी.
susurration स्यूसरेशन् n.--- कुजबूज.